शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

Father's Day Special : आई गेली देवाघरी, निवृत्तीच मुक्या मुलीचा सांभाळ करी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 12:13 IST

Father's Day Special : वडिलांनी मुलांना सावत्रपणाची वागणूक मिळू नये, यासाठी दुसरे लग्न केले नाही.

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  ती जन्मजात मुकी आहे, तिच्याकडून हात आणि डोळ्यांव्दारे केल्या जाणाऱ्या इशाऱ्यांवरूनच तिला काय हवे, हे समजून घ्यावे लागते. अशा स्थितीत ती १० वर्षांची असतानाच तिच्या आईने जगाचा निरोप घेतला. वडिलांनी मुलांना सावत्रपणाची वागणूक मिळू नये, यासाठी दुसरे लग्न केले नाही. धीर खचू न देता मुलीचा मोठ्या आत्मीयतेने सांभाळ केला. निवृत्ती आळणे (वाशिम) असे नाव असलेल्या त्या वडिलांचे काैतुक करावे तेवढे कमीच आहे.दाढी-कटिंगचा व्यवसाय असलेल्या निवृत्ती आळणे यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यापैकी बाली नावाच्या मुलीला जन्मपासूनच बाेलता येत नाही. इतर दोन मुले धडधाकट आहेत. निवृत्ती आळणे यांनी स्वत:च्या सुखाचा विचार न करता तिन्ही मुलांचा सांभाळ केला. मुलीला चांगले स्थळ शोधून तिचे लग्न लावून दिले; तर मुलाचेही लग्न झाले असून तो पुणे येथे पत्नी, मुलांना घेऊन वास्तव्य करीत आहे. मुक्या असलेल्या बालीचेही एका पायाने दिव्यांग व मुक्या मुलासोबत लग्न झाले होते; मात्र नवरा मारझोड करणारा निघाला. त्यामुळे कालांतराने विभक्त व्हावे लागले. तेव्हापासून बापाला मुक्या मुलीचा आणि तिला वडिलांचाच आधार आहे. निवृत्ती आळणे यांना उतारवयामुळे दाढी-कटिंगचे काम करता येणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी गळत असलेल्या मोडक्यातोडक्या घरात वास्तव्य करीत असताना शासनाकडून निराधार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावर बाप-लेकींचा उदरनिर्वाह सुरू आहे. अधूनमधून मानधन लांबल्यास दोघांवरही उपासमारीची वेळ ओढवते. आजारी पडल्यास दवाखान्यासाठी पैसे नसतात. असे असतानाही ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा’, याप्रमाणे निवृत्ती आळणे स्वत:सोबतच मुलीचा सांभाळ करीत आहेत.

टॅग्स :Father's Dayजागतिक पितृदिनwashimवाशिम