शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Fathers Day : १४ अंधाचे पितृत्व स्वीकारणारा ‘बाप माणूस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 11:35 IST

केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर १४ मुलांचा त्यातही ते अंध मुलांचा जन्म न देता बाप झाला आहे.

- नंदकिशोर नारे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यातील एकदम छोटयाश्या गावात झोपडीत राहणारा स्वताच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत होत असताना केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर १४ मुलांचा त्यातही ते अंध मुलांचा जन्म न देता बाप झाला आहे. त्यांचा पालन पोषणसह शिक्षणाची जबाबादारी तो आवर्जून पार पाडत आहे.अतिशय छोटेस व शहरापासून अतिशय जवळ असलेले केकउमरा येथल पांडुरंग हे आपल्या गावात पत्नी गंगासागर, एक मुलगी चेतना व अंध मुलगा चेतन यांच्या सोबत आपल्या संसाराचा गाडा हाकत असताना आपल्या अंध चेतनच्या समस्या पाहून त्यांचे मन हेलावेल. त्यांनी अंध विद्यार्थ्यांना आसरा देण्याचे कार्य हाती घेतले . पाहता पाहता त्यांच्या झोपडीत १४ मुले जमा झालीत यामध्ये दशरथ जोगदंड, कैलास पानबुडे, भरत खांडेकर, विजय खडसे, विकास गाडेकर, अश्विनी पवार, राधिका गाडेकर, अमोल गोडघासे, लक्ष्मी पानबुडे, गजानन खडसे, रुपेश हिरोळकर, मंगेश पुणेकर, रुपाली फुलसावंगे यांचा समावेश आहे. सुरुवातील या सर्व मुलांचा सांभाळ करताना अतिशय कठीण दिवस काढावे लागलेत. आज अंध असताना पांडुरंगाचे ते आधार झाले आहेत. या सर्वांनी आर्केस्टा काढून लग्न समारंभ सामाजिक उपक्रासम शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करीत आहेत. रक्षा बंधनानितमत्त सर्व अंध मुले राख्या तयार करुन विकताहेत. आधि पैशांची जुळवाजुळव करताना येणारी अडचण त्यांना भासत नाही. अनेक सामाजिक कार्यकर्ते नेहमी त्यांचे कार्य पाहून त्यांच्या मदतीला धावतात. कोरोनाच्या पृष्ठभूमिवर त्यांना अतिशय कठीण परिस्थितीतून बाहेर जावे लागले, परंतु अनेकांनी मदतीचा हात पुढे केल्याने तोही वेळ निघून गेला. अनेक जण त्यांच्या कार्याचे कौतूक करताहेत.‘पेरलं ते उगवतं’ अशी एक मराठीत म्हण आहे. तसेच माझ्या काही बाबतीत घडले .माझ्या मुलापासून प्रेरणा मिळाल्याने ज्यांना कोणी सहारा देत नाही अशा अंध विद्यार्थी, बालक, युवकांना मी वागविण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कठीण प्रसंगातून न खचता व्यवस्था केली. आज तेच सर्व मला कुटुुंब चालवितांना मदत करताहेत.-पांडुरंग उचितकरमाझा मुलगा अंध असतांना त्यांचे दुख पाहून माझ्या पतीने अंध मुलांचा सांभाळ करण्याचा घेतलेला निर्णय आवडला. परंतु सुरुवातीला आमच्या कुटुंबियांसह त्यांचा उदरनिर्वाह करताना होत असलेली कसरत व त्यांचेही होत असलेले हाल पाहवत नव्हते. परंतु निर्णय योग्य असला की वेळही साथ देते. आज आम्ही सर्व खूष आहोत.-गंगासागर उचितकर

टॅग्स :washimवाशिमFather's Dayजागतिक पितृदिन