शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Father's Day : १४ अंध मुलांच्या आयुष्यात आनंद भरणारा डोळस बाप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 14:01 IST

वाशिम  : तालुकयातील एकदम छोटयाशा गावात झोपडीत राहणारा, स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना तारेवरची कसरत होत असतानाही केकतउमरा येथील ‘पांडुरंग’ १४ अंध मुलांचा जन्म न देता बाप झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  : तालुकयातील एकदम छोटयाशा गावात झोपडीत राहणारा, स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना तारेवरची कसरत होत असतानाही केकतउमरा येथील ‘पांडुरंग’ १४ अंध मुलांचा जन्म न देता बाप झाला आहे. त्यांच्या पालन पोषणासह शिक्षणाची जबाबदारी तो आवर्जुन पार पाडत असून त्याच्या या उपक्रमाची अनेकांनी दखल घेवून मदतीचा हातही पुढे केला आहे.वाशिम तालुक्यातील अतिशय छोटसे व शहरापासून अतिशय जवळ असलेले केकतउमरा गाव. केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर हे आपल्या गावात पत्नी गंगासागर, एक मुलगी चेतना व अंध मुलगा चेतन यांच्यासोबत आपल्या संसाराचा गाड हाकत असतांना आपल्या अंध चेतनच्या समस्या पाहून त्यांचे मन हेलावले. त्यांनी अंध विद्यार्थ्यांना आसरा देण्याचे कार्य हाती घेतले. पाहता पाहता त्यांच्या झोपडीत १४ मुले जमा झालीत. आज त्यांच्या शिक्षणाच्या सोईसह त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यास ते वडिलांचे कार्य पार पाडत आहेत. त्यांच्या या कार्याची माहिती एवढया दूरपर्यंत पोहचली की अनेकांनी त्यांच्या झोपडीला भेट देवून त्यांच्या कार्याची दखल घेतली. विशेष म्हणजे काही वर्षाआधी वाशिम येथे समाजसेवक अण्णा हजारे आले असता त्यांनी स्वताहून तुमच्या जिल्हयात पांडुरंग नावाचा कोणी एक व्यक्ती आहे. जे समाजकार्य करतात त्यांना मला भेटायचे असे म्हटले. लगेच उपस्थितांनी पांडुरंग उचितकर असे नाव सांगतातच त्यांच्या घरी गेले, त्यांची भेट घेतली व त्यांच्या या कार्याचे कौतूक केले. आजच्या घडीला उचितकर यांची झोपडी ‘चेतन सेवांकुर’या नावाने ओळखल्या जात आहे. विशेष म्हणजे हे सर्व अंध विद्यार्थी स्वता रोजगार उपलब्ध करुन पांडुरंगाला संसार चालवितांना मदत करतांना दिसून येत आहेत. चेतन उचितकर यांनी एक आर्केस्टा काढून लग्न समारंभ, सामाजिक उपक्रमासह शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करीत आहेत. रक्षाबंधनानिमित्त सर्व अंध मुले राख्या तयार करुन ते शहरातील मंदिरे, मुख्य चौकात विकून पैसा मिळवितांना दिसून येतात. विशेष म्हणजे त्यांना कोणीही विचारले की तुमचे नाव , गाव काय तर ते स्वताचे नाव व पुढे पांडुरंग उचितकर सांगत आहेत.

टॅग्स :washimवाशिमFather's Dayजागतिक पितृदिन