मालेगाव (वाशिम) : नियती कधी कोणता डाव साधेल याचा नेम नाही. मालेगाव-शेलूबाजार मार्गावर १0 ऑक्टोबर रोजी झालेल्या अपघातात दोष नसतानाही मृत्यूमुखी पडलेल्या वडपच्या पिता- पुत्राच्या मृत्यूने ही बाब अधोरेखीत केली आहे. ११ ऑक्टोबर रोजी एकाच चितेवर या पितापुत्रांना चिताग्णी देण्यात आला. कुटूंबीयांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले. वडप येथील विजय बाळकृष्ण गायकवाड व त्यांचा मुलगा विशाल विजय गायकवाड नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले ते कायमचेच. खिर्डा येथे असलेल्या प्रसादासाठी वडप येथील विजय गायकवाड व विशाल गायकवाड पितापूत्र १0 ऑक्टोबर रोजी दूचाकीने जात होते. डव्हा ते खिर्डा दरम्यान नागपूर-औरंगाबाद हायवेवर धावता ट्रक त्यांच्या दूचाकीवर कोसळून दोघे पितापुत्र जागीच गतप्राण झाले. ११ ऑक्टोबर रोजी वडप गावातून एकाच तिरडीवर पितापुत्राची अंत्ययात्रा काढली गेली. एकाच चितेवर शेकडोंच्या साक्षीने पितापुत्रांना साश्रुनयनांनी चिताग्नी दिला गेला. यावेळी गायकवाड कुटुंबीयांनी व गावकर्यांनी सर्वासमक्ष गायकवाड पितापुत्रांच्या आठवणींना अश्रुबरोबरच वाट मोकळी करुन दिली. शाळेबरोबरच लहान वयातही पित्याच्या कायम सोबत राहणारा मृतक विशाल शेतीकामातही पित्याला मदत करायचा. मृतक विजय गायकवाडहर्ी कामात लक्ष रामा. प्रमाणे वागत कुणालाही न दूखविणारेच. त्यामुळे गावकर्यांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाना यावेळी अश्रु अनावरच झाले.
एकाच चितेवर पिता-पुत्रांना चिताग्णी
By admin | Updated: October 12, 2014 02:03 IST