शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

मानोरा-मंगरुळपीर मार्गावर शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 13:45 IST

जोगलदरी (जि. वाशिम):  ग्रामीण भागांत उच्च शिक्षणाच्या असुविधेपोटी शहरी भागात ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्क जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

ठळक मुद्दे गावांतील विद्यार्थी गावांत पुरेशा शिक्षण सुविधेअभावी मंगरुळपीर शहरातील शाळांत शिक्षण घेत आहेत. पुरेशा बसफेऱ्या नसल्याने त्यांना आॅटोरिक्षा, काळीपिवळी किंवा इतर खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. विद्यार्थ्यांना शक्य तेवढे आत कोंबून बसविले जाते किंवा वाहनाच्या मागील भागांत लटकणाºया स्थितीत उभे ठेवले जाते.

चित्र: वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन लोकमत न्यूज नेटवर्कजोगलदरी (जि. वाशिम):  ग्रामीण भागांत उच्च शिक्षणाच्या असुविधेपोटी शहरी भागात ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्क जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. खाजगी वाहनांत जनावरांसारखे कोंबून आणि मागच्या बाजूला वाहनाबाहेर लटकत उभे ठेवून विद्यार्थ्यांना प्रवास घडविला जात आहे. मंगरुळपीर-मानोरा मार्गावर रोजच हे थरारक आणि धोकादायक चित्र पाहायला मिळत आहे.मंगरुळपीर-मानोरा मार्गावरील जोगलदरी, कोळंबी, दाभा, कोठारी, कवठळ, सावरगाव, चेहेल, धानोरा आदि गावांतील विद्यार्थी गावांत पुरेशा शिक्षण सुविधेअभावी मंगरुळपीर शहरातील शाळांत शिक्षण घेत आहेत. सकाळी ७ वाजतापासून हे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी वाहनांची प्रतिक्षा करताना रस्त्यावर उभे असतात. त्यात ग्रामीण भागांत पुरेशा बसफेऱ्या नसल्याने त्यांना आॅटोरिक्षा, काळीपिवळी किंवा इतर खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. या वाहनांत आधीच प्रवासी बसले असताना विद्यार्थ्यांना शक्य तेवढे आत कोंबून बसविले जाते किंवा वाहनाच्या मागील भागांत लटकणाºया स्थितीत उभे ठेवले जाते. सकाळी ७ ते ८ दुपारी ११ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ६ या वेळेत मंगरुळपीर-मानोरा मार्गावर विद्यार्थ्यांचा हा जीवघेणा शिक्षण प्रवास रोज पाहायला मिळतो. या गंभीर प्रकारामुळे अपघात घडण्याची दाट शक्यता असतानाही वाहतूक पोलिसांकडून याची दखल घेतली जात नाही. प्रवासी क्षमतेच्या नियमांचे उल्लंघनपरिवहन विभागाच्यावतीने विविध प्रवासी वाहनांची प्रवासी क्षमता किंवा संख्या निर्धारित करण्यात आली आहे. जीप किंवा काळीपिवळीसारख्या वाहनांत ८ अधिक १, लहा आॅटोरिक्षात ३ अधिक १, तसेच इतर वाहनांसाठी आकारमानानुसार प्रवासी संख्येची क्षमता निर्धारित करण्यात आलेली आहे. त्यामुळे खाजगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची मूभा असली तरी, या नियमांचे बंधन पाळणे आवश्यक आहे; परंतु वाहतुकीचे हे नियम धाब्यावर बसवून खाजगी वाहनधारक प्रवासी वाहतूक करीत आहेत. त्यात काही वाहने, तर केवळ विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठीच वापरण्यात येत असली तरी, एका वाहनांत २० पेक्षा अधिक विद्यार्थी कोंबले जात आहेत.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराStudentविद्यार्थी