शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वाशिम जिल्हा परिषदेसमोरील उपोषणाची सांगता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 14:50 IST

वाशिम : बनावट स्वाक्षरी करून ग्रामपंचायत सचिवाने ठेकेदाराच्या सहाय्याने लाखो रुपयांचा निधी काढला असून, याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसलेल्या जोडगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या उपोषणाची सांगता गुरूवारी सायंकाळी झाली.

ठळक मुद्देजोडगव्हाण येथे नियमीत ग्रामसेवक द्यावा, आदी मागण्यांसाठी कांबळे यांनी २८ मे पासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी याप्रकरणी चौकशीचे आश्वासन दिल्याने सदर उपोषण मागे घेण्यात आले.

वाशिम : बनावट स्वाक्षरी करून ग्रामपंचायत सचिवाने ठेकेदाराच्या सहाय्याने लाखो रुपयांचा निधी काढला असून, याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसलेल्या जोडगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या उपोषणाची सांगता गुरूवारी सायंकाळी झाली. याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी दिले. 

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात जोडगव्हाण येथील रमा राहूल कांबळे सरपंच कांबळे यांनी नमूद केले आहे की, सचिवाने ठेकेदाराच्या मदतीने शासनाचा लाखो रुपयांचा निधी आपली बनावट सही करून हडप केला. याबाबत दोषीविरुद्ध कारवाई करण्यात यावी. बनावट सही करणाºया सचिवाला निलंबीत करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व शासनाची फसवणूक केल्याबद्दल दंड वसूल करण्यात यावा, या मागणीसह महिला सरपंचाचा हक्क डावलणाºया सचिवावर प्रशासकीय कारवाई करावी, सरपंचाला अंधारात ठेवून जनसुविधा योजनेचा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरीता असलेला निधी दलित वस्तीत खर्च न करता अन्यत्र खर्च केल्याप्रकरणी कारवाई करावी तसेच जोडगव्हाण येथे नियमीत ग्रामसेवक द्यावा, आदी मागण्यांसाठी कांबळे यांनी २८ मे पासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. ३१ मे रोजी सरपंच संघटनेचे अध्यक्ष दीपक खडसे, तालुका सचिव विनोद पट्टेबहादूर , टनका येथील सरपंच राधेश्याम गोदारा यांच्या मध्यस्थीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी याप्रकरणी चौकशीचे आश्वासन दिल्याने सदर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी सभापती सुधीर पाटील गोळे यांची उपस्थिती होती.

दरम्यान, सरपंचांच्या या मुद्याच्या अनुषंगाने गावातील दुसºया बाजूनेही ३१ मे रोजी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. संबंधित कंत्राटदाराने ‘कमिशन’ न दिल्याने खोटी तक्रार देण्यात आली, १४ व्या वित्त आयोगाचा निधी अद्यापपर्यंत खर्च केला नाही, ग्रामपंचायतचे खाते, रोजगार हमी, जनसुविधा, चौदावा वित्त आयोगाचे खाते गोठलेले आहे, ग्रामपंचायत सरपंच या महिला असून त्यांचे अधिकार हे त्यांचे पती भूषवितात, त्यामुळे ते शासकीय कामात नेहमीच अडथळा आणतात,  असा आरोप विरोधकांनी या उपोषण आंदोलनात निवेदनाद्वारे केला. शौचालय बांधकाम झालेल्या लाभार्थींना पैशाची मागणी करतात. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी दुसºया गटाने केली. या उपोषणाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, माजी जि.प. सदस्य दिलीप देशमुख, जि.प. सदस्य चक्रधर गोटे, दीपक खडसे, विनोद पट्टेबहादूर , टनका येथील सरपंच राधेश्याम गोदारा यांनी भेट  दिली . याप्रकरणी योग्य ती चौकशी केली जाईल, असे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी दिल्याने या उपोषणाचीदेखील सांगता झाली.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद