शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

हमीभावापेक्षा शेतमालाच्या दरात एका हजाराने घसरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 2:57 PM

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : शासनाने जाहिर केलेल्या हमीभावापेक्षा जवळपास एक हजार रुपये कमी दराने बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, मूग ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाने जाहिर केलेल्या हमीभावापेक्षा जवळपास एक हजार रुपये कमी दराने बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, मूग या शेतमालाची खरेदी केली जात आहे. प्रति क्विंटल एक हजार रुपयाचे आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.यावर्षी सुरुवातीपासून निसर्गाची अवकृपा झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. मृग नक्षत्रात वेळेवर हजेरी न लावणाºया पावसाने त्यानंतरही सातत्य ठेवले नाही. ऐन सोंगणीच्या काळात अवकाळी पावसाने सोयाबीनचे नुकसान केले. जिल्ह्यात यावर्षी जवळपास पावणे तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली होती. सोयाबीनची आवक वाढताच बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव यावर्षीही शेतकºयांना आला आहे. सोयाबीनला ३७१० रुपये प्रती क्विंटल, मूगाला ७०५० रुपये प्रती क्विंटल, उडदाला ५७०० रुपये प्रती क्विंटल असा हमीभाव आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढताच बाजारभाव २२०० ते ४००० रुपयादरम्यान स्थिरावले आहेत. सोयाबीनला सरासरी २७०० ते २८०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत असल्याने हमीभावापेक्षा एक हजार रुपये आर्थिक नुकसान हे प्रति क्विंटलवर सहन करावे लागत आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया देऊळगाव बंडा येथे सोनुबाबा सरनाईक, चिखली येथील गौतम भगत, सोनगव्हाण येथील रमेश पाईकराव या शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. मूगाला ७०५० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव असतानाही सरासरी ५८०० रुपये दर मिळत आहे. यामुळे शेतकºयांना जवळपास १२०० रुपये कमी दर मिळत आहे. ही बाब शेतकºयांसाठी आर्थिक नुकसानाची ठरत आहे. शेतमालाची प्रतवारी घसरल्याने अडचणीअवकाळी पावसामुळे बहुतांश ठिकाणी सोयाबीन या शेतमालाची प्रतवारी घसरली आहे. शासकीय खरेदी केंद्रावर मात्र एफएक्यू दर्जाचा शेतमालच हमीभावात खरेदी केला जातो. त्यातही शेतमालाची चाळणी करून मोजणी होते. शिवाय या केंद्रावर विक्री केलेल्या शेतमालाचे चुकारे विलंबाने मिळतात. या सर्व बाबीचा परिणाम म्हणून अनेक शेतकरी बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी नेत आहेत, बाजार समित्यांमध्ये हमीभावानुसार खरेदी नसल्याने शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करू नये अशा सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत. शेतकºयांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.-रमेश कटकेजिल्हा उपनिबंधक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिमFarmerशेतकरी