शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तूर उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतिक्षा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 16:28 IST

शेतमालाची प्रचंड आवक वाढल्याने विहित मुदतीत अनेक शेतकºयांच्या तूरीची खरेदी करणे या केंद्रांना शक्य झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककार्ली : नाफेडकडे नोंदणी केल्यानंतर तूर विक्री न झालेल्या शेतकºयांना एक हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा तत्कालिन सरकारने केली होती. गत दोन वर्षापासून कार्ली परिसरातील शेकडो शेतकºयांना अद्याप सदर अनुदान मिळाले नाही.सन २०१८ च्या खरीप हंगामातील तुर पिकाकरिता नाफेडअंतर्गत शेतमालाला आधारभूत किंमतीप्रमाणे रास्त भाव मिळण्यासाठी तुर खरेदी केंद्र  सुरू केले होते. शेतमालाची प्रचंड आवक वाढल्याने विहित मुदतीत अनेक शेतकºयांच्या तूरीची खरेदी करणे या केंद्रांना शक्य झाले नाही. शेतकºयांचे नुकसान होऊ नये म्हणून नाफेडकडे आॅनलाईन नोंदणी केलेल्या; परंतू विहित मुदतीत शेतमाल खरेदी न झालेल्या शेतकºयांना प्रति क्विंटल १ हजार प्रमाणे अनुदान देण्याचे शासनाचे जाहिर केले होते. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात अन्यत्र झाली आहे. कार्ली परिसरातील शेकडो शेतकºयांना अद्याप अनुदान मिळाले नाही. बँकेत जावुन बँक खात्यात अनुदान जमा झाले का,  हे पाहण्यासाठी अनेक शेतकरी चकरा मारत असल्याचे दिसून येते. नवीन सरकारने तरी तूर अनुदानाचे पैसे द्यावे, अशी अपेक्षा शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. अगोदरच नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. कधी पावसाचा अनियमितपणा तर कधी अवकाळी पाऊस व गारपिट यामुळे शेतकºयांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. त्यातच अनुदानाचेही पैसे मिळत नसल्याने शेतकºयांची चिंता अधिकच वाढत आहे. दोन वर्षानंतरही अनुदान मिळत नसल्याने प्रशासकीय दिरंगाई समोर येत आहे. यासंदर्भात विचारणा केली असता, टाळाटाळ केली जाते, असा आरोपही कार्ली परिसरातील शेतकºयांनी केला. माझ्या शेतातील तुर या शेतमालाची हमीभावाने विक्री व्हावी म्हणून नाफेडकडे आॅनलाईन नोंदणी सन २०१८ ला केली होती. मात्र दोन वर्र्षे लोटली तरी अद्याप अनुदानाचा पत्ता नाही. याबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारमध्येही तक्रार केली होती. त्यावर लवकर निर्णय घेण्याचे कबुल करणाºया  अधिकाºयांना अजुनही याबाबत वेळ मिळाला नाही. संबंधित अधिकारी हे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या समक्ष वेळ मारुन नेतात, ते आमच्या सारख्या शेतकºयाना काय वेळ देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.-व्दारकाबाई घमराव देशमुख,रा. कार्ली ता.जि.वाशिम

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र