शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कापूस खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 16:23 IST

Cotton Purchasing News शासकीय खरेदी केंद्रांना यंदा १ फेब्रुवारीपर्यंत केवळ १ लाख १४ हजार ८३५ क्विंटलच कापूस खरेदी करणे शक्य झाले.

वाशिम: खासगी बाजारात कापसाचे दर हमीदरापेक्षा अधिक झाल्याने शेतकºयांनी शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे पाठ केली आहे. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्रांना यंदा १ फेब्रुवारीपर्यंत केवळ १ लाख १४ हजार ८३५ क्विंटलच कापूस खरेदी करणे शक्य झाले असून, आता सहापैकी एकाही केंद्रावर क्विंटलभरही कापसाची आवक होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गत खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकºयांना वारंवार निसर्गाच्या अनियमितेचा फटका सहन करावा लागला. अतिवृष्टीसह परतीच्या पावसाने कपाशीचे नुकसान केले असतानाच बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट आली. त्यात शासनाने मध्यम धाग्याच्या कपाशीला प्रती क्विंटल ५६१५, तर लांब धाग्याच्या कपाशीला ५७२५ रुपये प्रती क्विंटल हमीदर घोषीत केले असताना बाजारात  अवघ्या ५००० ते ५२०० रुपये प्रती क्विंटल दराने कपाशीची खरेदी केली जात होती. त्यामुळे हताश झालेल्या शेतकºयांकडून शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात होती. शेतकºयांच्या मागणीची दखल घेऊन सीसीआयने जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू केली. त्यात सुरुवातीला मंगरुळपीर, अनसिंग येथे, तर त्यानंतर कारंजा येथे दोन, कामरगाव आणि मानोरा येथे प्रत्येकी एक केंद्रही सुरू केले. कारंजा, मंगरुळपीर आणि अनसिंग येथील केंद्रावर सुरुवातीला विक्रमी आवक झाली. त्यानंतर मात्र खासगी बाजारात कपाशीचे दर वाढू लागल्याने शासकीय केंद्रांकडे शेतकºयांनी पाठ करणे सुरू केले. परिणामी, गेल्या पाच दिवसांपासून शासकीय केंद्रावर एक क्विंटल कपाशीचीही खरेदी होऊ शकली नाही, तर १९ नोव्हेंबर २०२० ते १ फेब्रुवारी २०२१ दरम्यानच्या काळात सर्व शासकीय केंद्रांवर मिळून केवळ १ लाख १४ हजार ८३५ क्विंटल कापसाची खरेदी होऊ शकली आहे.  

टॅग्स :cottonकापूसwashimवाशिम