वाशिम - विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी फलोत्पादन शेतीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सन २०१२-१३ या वर्षात १५०० हेक्टरवर असलेले फळबागांचे क्षेत्रफळ सद्यस्थितीत १३४ हेक्टरपर्यंत खाली घसरले आहे.जिल्ह्यात सिंचनाची पुरेशी सुविधा आणि फळबागांसाठी पोषक वातावरण नसल्याचे कारण समोर करून बहुतांश शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करीत असल्याचे दिसून येते. खरिप व रब्बी अशा दोन्ही हंगामात जवळपास पाच लाख हे्क्टर क्षेत्रफळावर पेरणी होती. याशिवाय उर्वरीत काही क्षेत्रफळावर फळबाग लागवड आहे. २०१२-१३ मध्ये आंबा, संत्रा, पेरू, डाळींब, सिताफळ, आवळा, कागदी लिंबू, मोसंबी आदी फळबागांची लागवड १५०० हेक्टर क्षेत्रफळावर झाली होती. २०१३-१४ मध्ये १६६ हेक्टर, २०१४-१५ मध्ये ३८५, २०१५-१६ मध्ये १४५ आणि २०१६-१७ मध्ये १३४ हेक्टर क्षेत्रफळावर फळबागांची लागवड झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.
फलोत्पादनाकडे शेतकऱ्यांची पाठ !
By admin | Updated: April 23, 2017 19:47 IST