शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 22:11 IST

आता महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, शिवसेनेला हे राज्य सुजलाम्, सुफलाम् करायचे आहे

वाशिम - शासनाकडून कर्जमुक्तीची केवळ घोषणाच झाली आहे. आता महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, शिवसेनेला हे राज्य सुजलाम्, सुफलाम् करायचे आहे, असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवार, २८ आॅगस्ट रोजी कारंजा येथे जन आशिर्वाद यात्रेला संबोधित करताना केले. बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे कारंजा येथे जन आशीर्वाद यात्रा घेऊन दाखल झाले. यावेळी त्यांनी  विविध विषयांवर कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघातील युवक-युवतींशी संवाद साधला. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, की ही यात्रा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन नव्हे; तर तर जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी काढण्यात आली आहे. राज्यातील शेतक-यांना अद्यापपर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळालेली नाही. पिकविम्याचा प्रश्नही प्रलंबित आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यावर मात करण्यासाठी जनतेची मदत हवी आहे. शेतकºयांनी आत्महत्या न करता शिवसेनेसारखा कणखर विचार करावा, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. आदित्य ठाकरे कारंजात दाखल झाल्यानंतर आमदार गोपीकिशन बाजोरिया, पालकमंत्री संजय राठोड आणि माजी आमदार प्रकाश डहाके यांनी गुरुमाऊलीची प्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्यासह वाशिम जिल्ह्यातील शिवेसना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.   सायंकाळी ४ वाजताची सभा सुरू झाली रात्री ८ वाजतायुवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआर्शीवाद यात्रेची कारंजा येथील सभा ही सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र या सभेला रात्री ८ वाजताच्या सुमारास सुरूवात झाली. यामुळे उपस्थित शिवसैनिक आणि युवा कार्यकर्त्यांसह लोकांना तब्बल चार तास ताटकळत बसावे लागले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना