शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मालाची होणार थेट ग्राहकांना विक्री; बुधवारपासून वाशिममध्ये कृषी महोत्सव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 17:06 IST

वाशिम : शेतकऱ्यांकडून उत्पादित शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री करण्याची संधी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहोत्सवाचे उद्घाटन २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे.बाजाराभिमुख कृषि उत्पादनास आणि विपणनास चालना देणे हा जिल्हा कृषि महोत्सवामागील मूळ उद्देश असल्याचे डॉ. जाधव यांनी कळविले आहे.

वाशिम : शेतकऱ्यांकडून उत्पादित शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री करण्याची संधी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या जिल्हा कृषी महोत्सवात या उपक्रमासोबतच कृषि प्रदर्शनी, पशू प्रदर्शन, शेतकरी प्रशिक्षण, सेंद्रिय शेतमाल विक्री आदिंचा समावेश करण्यात आला आहे. सुंदरवाटिका येथील काटा कोंडाळा चौक येथे होणाºया या कृषि महोत्सवास भेट देवून नागरिकांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. दिनकर जाधव यांनी केले आहे.महोत्सवाचे उद्घाटन २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते होणार असून महसूल राज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. याशिवाय इतरही मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. कृषिविषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी-शास्त्रज्ञ आणि संशोधन-विस्तार-शेतकरी-विपणन साखळी सक्षमीकरण, समूह-गट संघटीत करून स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकºयांच्या मालास योग्य दर मिळावा व ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा, याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीशृंखला विकसित करणे, कृषिविषयक परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणीद्वारे शेतकºयांच्या समस्यांचे निवारण करणे, विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषि उत्पादनास आणि विपणनास चालना देणे हा जिल्हा कृषि महोत्सवामागील मूळ उद्देश असल्याचे डॉ. जाधव यांनी कळविले आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र