रिसोड: तालुक्यातील ग्राम गोवर्धन येथील शेतकरी तथा माजी उपसरपंच प्रभाकर राजाराम काळबांडे यांच्यावर रानडुकराने हल्ला करून जखमी केल्याची घटना २८ मे दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. प्रभाकर काळबांडे हे स्वत:च्या केळीच्या शेतामध्ये काम करीत असताना अचानक रानडुकराने पाठीमागून येवून हल्ला चढवला व प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या मांडीवर चावा घेतला त्यामुळे ते जखीम झाले. यावेळी त्यांनी आरडाओरड केली; मात्र आजूबाजूला कुणीच नसल्यामुळे कुणीही त्यांच्या मदतीला आले नाही. त्यानंतर ते जागीच बेशुद्ध अवस्थेत पडले. गावातील लोकांना याबाबत माहिती कळल्यावर त्यांना रिसोड येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी भरती केले. रानडुकराच्या हल्ल्याची तालुक्यात या दिवशी दुसरी घटना आहे. संबंधित विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गोवर्धनवासीयांनी केली आहे.
रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By admin | Updated: May 30, 2016 02:30 IST