शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांअभावी मशागतीसाठी शेतकऱ्यांना घरच्या मंडळीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 16:02 IST

मजुरांचा तुटवडा भासत असल्याने अनेक शेतकरी घरच्या महिला मंडळीचा आधार घेऊनच ही कामे करीत असल्याचे चित्र मानोरा तालुक्यातील इंझोरी, वाकी शिवारासह सर्वत्र पाहायला मिळत आहे.

खरीपाची तयारी: काडीकचरा वेचणीसह नांगरणीची लोकमत न्यूज नेटवर्क इंझोरी ( वाशिम ) : उन्हाळा अर्ध्यावर आला असताना खरीपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांनी लगबग सुरू केली आहे. तथापि, मजुरांचा तुटवडा भासत असल्याने अनेक शेतकरी घरच्या महिला मंडळीचा आधार घेऊनच ही कामे करीत असल्याचे चित्र मानोरा तालुक्यातील इंझोरी, वाकी शिवारासह सर्वत्र पाहायला मिळत आहे.खरीपाच्या हंगामात तणाची वाढ होऊ नये, किटकांचे कोष नष्ट व्हावे. जमिनीचा कस वाढविण्यासाठी सेंद्रिय खताची मात्रा टाकता यावी म्हणून शेतकºयांनी शेतजमिन साफ करून नांगरणीची कामे सुरू केली आहेत. त्यासाठी मजुरांची शोधाशोध सुरू आहे; परंतु यंदाही जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, रिसोड तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीरही केला आहे, तर मानोरा तालुक्यातील उमरी खु. मंडळातही दुष्काळ जाहीर केला आहे. तथापि, कमी अधिक प्रमाणात जिल्हाभरातच दुष्काळाच्या झळा पसरल्याचे दिसत असून, रोजगाराचा प्रश्न गंभीर झाल्याने शेतमजूर परिवारासह परराज्यात रोजगारासाठी गेले आहेत. ही मंडळी अगदी खरीपाच्या सुरुवातीलाच परतणार असल्याने जिल्ह्यात मजुरांची वाणवा निर्माण झाली आहे. मानोरा तालुक्यात हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शेतकºयांना मजूर मिळेनासे झाले आहेत. परिणामी खरीपासाठी शेतजमीन तयार करण्यासाठी शेतकरी स्वत: राबण्यासह घरच्या महिला मंडळीचा काडीकचरा वेचणी व इतर कामांसाठी आधार घेत आहेत.  

रखरखत्या उन्हात महिलांचे श्रमगावात शेतमजूर मिळत नसल्याने शेतीची कामे रखडली जाऊन खरीप हंगामावर त्याचा परिणाम होऊ नये, ही बाब शेतकरी वर्गाला त्रस्त करीत आहे. घरधन्यांची ही पंचाईत लक्षात घेऊन महिला मंडळीने शेती मशागतीच्या कामांत हातभार लावण्यास पुढाकार घेतला असून, रखरखत्या उन्हात अनेक ठिकाणी महिला स्वत:च्या शेतीतच काडी कचरा वेचून त्याची विल्हेवाट लावताना दिसत आहेत. पुढील महिनाभर रखरखत्या उन्हातच त्यांना शेतीसाठी राबावे लागणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती