शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

वनक्षेत्रालगत जमीन असलेला शेतकरी बारामही राखणीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 15:33 IST

शेतातच छोट्या स्वरूपातील झोपड्या उभारण्यात आल्याचे दिसून येते.

- माणिक डेरेलोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील अनेक गावांमधील शेती ही वनक्षेत्राला लागून आहे. यामुळे शेतांमधील पिकांना वन्यप्राण्यांचा धोका कायमचाच लागून असतो. वनविभाग मात्र याबाबत मूग गिळून गप्प असल्याने शेतकऱ्यांनाच पिकांच्या रक्षणासाठी शेतांमध्ये बाराही महिने ‘जागल’साठी जावे लागते. त्याकरिता शेतातच छोट्या स्वरूपातील झोपड्या उभारण्यात आल्याचे दिसून येते.मानोरा तालुक्यातील विठोली, बेलोरा, हातना, भुली, पोहरादेवी, आमदरी, सावरगांव, मेंद्रा, वटफळ यासह इतरही अनेक गावांमधील शेतकऱ्यांची शेती वनक्षेत्रालगत वसलेली आहे. त्यावर खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामात विविध स्वरूपातील पिकांची पेरणी करण्यात येते; परंतु लागवडीपासूनच रानडुक्कर, रोही, हरीण, वानर आदी वन्यप्राण्यांचा त्रास सुरू होत असल्याने पिके संकटात सापडतात. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मात्र वनविभागाचे कुठलेच अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने शेतांमध्ये उभारलेल्या झोपड्यांमध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतुंमध्ये रात्रीलाही झोपायला जावून तथा जीव धोक्यात घालून दोन्ही हंगामातील पिकांचे रक्षण स्वत:च करावे लागत असून त्यास वनविभागाचा अकार्यक्षमपणा आणि बेजबाबदार वृत्ती कारणीभूत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.नैसर्गिक संकटांमुळे पोहरादेवी परिसरातील शेतकरी आधीच जेरीस आलेला आहे. त्यातच वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे वन्यप्राण्यांपासूनही शेतीपिकांचे नित्यनेम नुकसान होत आहे. असे असताना गत दोन वर्षात वनविभागाकडून या भागात गस्त सुरू असल्याचे कधी दिसून आले नाही, अशी माहिती पोहरादेवी येथील महंत रमेश महाराज राठोड यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा