वाशिम : येथून जवळच असलेल्या सावरगाव जीरे येथील शेतकरी रोहित्राविना हवालदील झाले असून विद्युत महावितरण कंपनीने रोहीत्र त्वरित बसून द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. पोलिस पाटील अनिलराव सरनाईक यांच्या नेतृत्वात दिलेल्या सदर निवेदनामध्ये सावरगाव जिरे लघु पाटबंधारे योजना धरण स्थित असलेल्या जोडण्यांचे देयके २९ ऑक्टोबर रोजी भरण्यात आलेले असून ही अद्यापपर्यंत विद्युत रोहीत्र बसविण्यात आले नाही. त्यामुळे मोहजा व परिसरातील शेतकरी अद्यापही पेरणी करु शकले नाही. पेरणी न झाल्यामुळे शेतकर्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असून खोळंबलेली पेरणी करण्यासाठी विद्युत रोहित्र त्वरित जोडण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.
शेतपंपाचा वीजपुरवठा रोहित्राविना ठप्प
By admin | Updated: November 16, 2014 23:55 IST