शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पीक विम्यापासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:14 IST

शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी असलेली ३१ डिसेंबरची मुदत अंतिम संपली  तरी याबाबत निर्णय घेण्यात आला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात रब्बी पीक विम्याची जबाबदारी घेण्यास एकाही कंपनीने निविदा भरल्या नसताना शासनानेही जिल्ह्यात ही योजना राबविण्याची जबाबदारी भारतीय कृषी पीक विमा कंपनीकडे दिली नाही. त्यात शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी असलेली ३१ डिसेंबरची मुदत अंतिम संपली  तरी याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामात पीक विमा योजनेपासून वंचित राहणार आहेत.राज्यात खरीप हंगाम २०१६ पासून पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना रब्बी हंगाम २०१९-२० मध्ये राबविण्यास शासनाने २८ नोव्हेंबरच्या शासन निर्णयान्वये मंजुरीही दिली आहे. यानुसार राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यात अधिसूचित पिकांसाठी ही योजना राबविणे आवश्यक असल्याने यासाठी विमा कंपन्यांडून निविदा मागविण्यात आल्या. तथापि, राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी वाशिमसह १० जिल्ह्यांसाठी एकाही विमा कंपनीने निविदा भरली नाही. अर्थात या १४ जिल्ह्यातील पीक विम्याची जोखीम पत्करण्यास कोण तीही कंपनी तयार झालेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने या संदर्भात पुढाकार घेऊन शासनाच्या कृषी पीकविमा कंपनीकडे ही जबाबदारी सोपविण्यासाठी पाठपुरावा केला नाही. परिणामी, वाशिम जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामातील पीकविम्याच्या संरक्षणापासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात निवेदन सादर करून रब्बी पीकविमा योजना राबविण्याची मागणी करीत आहेत. वाशिमसह १० राज्यातील जिल्ह्यात कोणत्याही कंपनीने रब्बी पीकविम्याच्या जबाबदारीसाठी निविदा भरलेल्या नाहीत. या संदर्भात शासनस्तरावर निर्णय होणे अपेक्षीत होते. तथापि, अद्याप शासनाच्या कृषीविमा कंपनीकडे ही जबाबदारी सोपविण्यात आलेली नाही. आम्हालाही या संदर्भात कुठल्या सुचना देण्यात आल्या नसून, जिल्हास्तरावर या संदर्भातील कोणताच निर्णय घेतला जाऊ शकत नाही. शासनस्तरावरूनच या संदर्भात निर्णय घेतला जातो.-एस. एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमा