शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतिक्षा कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 16:01 IST

तीन महिने उलटले तरी घोषणेची अंमलबजावणी अद्यापही होऊ शकली नाही.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम; राज्य शासनाने शेतकºयांना महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रूपयांपर्यतची कर्जमाफी दिली, तर नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रोत्साहन अनुदानही देण़्याची घोषणा केली; परंतू, तीन महिने उलटले तरी घोषणेची अंमलबजावणी अद्यापही होऊ शकली नाही. त्यामुळे नि़यमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रतिक्षा आहे.महाविकास आघाडी शासनाकडून महात्मा ज्योतीराव फुले पीककर्जमुक्ती योजनेंतर्गत १ एप्रिल २०१५ ते मार्च २०१९ या कालावधित कर्ज घेतलेल्या शेतकºयांना २ लाखांपर्यंतच्या लाभाची रक्कम अदा करण्यासह नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनाही प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. ज्या शेतकºयांनी २०१७ ते २०१९ या कालावधित कर्ज घेतलेल्या शेतकºयांनी २०२० पर्यंत नियमित कर्जाची परतफेड केली असल्यास त्या शेतकºयांना २०१८-१९ या वर्षात घेतलेल्या पीककर्जाच्या रकमेवर जास्तीतजास्त ५० हजार रुपयांची रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्याची घोषणा यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आली होती; परंतु अद्याप या घोषणेची अमलबजावणी सुरू झालेली नाही आणि प्रशासनाला पात्र ठरणाºया शेतकºयांची यादी तयार करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांत निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.------------------.दोन लाखांवरील कर्जदार शेतकºयांनाही दिलासा नाहीमहाविकास आघाडी सरकारने २ लाखांपर्यंत कर्जमाफी तसेच ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान अशा दोन योजनांसह तिसरी योजनाही जाहीर केली होती. त्यात २ लाखांवर कर्ज थकबाकी असलेल्यांनाही २ लाखांपर्यंत माफी देण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी २ लाखांवर कर्ज थकित असलेल्या शेतकºयांना थकबाकी रक्कम आधी कर्जखात्यात भरावी लागणार होती. अद्याप या योजनेचा शासन आदेशही प्रतीक्षेत आहे.   नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत, तसेच २ लाखांवरील थकीत कर्जदार शेतकºयांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याबाबतचा आदेश किंवा शासन निर्णय अद्याप झालेला नाही. असा शासन निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यातील पात्र लाभार्थींची यादी तयार करून अमलबजावणी करण्यात येईल.-रवि गडेकर,जिल्हा उपनिबंधक, वाशिम  राज्यशासनाने नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची, तसेच २ लाखांपेक्षा अधिक कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांनाही २ लार्खांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणाही केली होती. शासनाने घोषणेनुसार अमलबजावणी तातडीने करावी, अशी ंअपेक्षा आहे.- नितिन पाटील उपाध्ये,शेतकरी, तथा ग्रा.पं. सदस्यकाजळेश्वर ता. कारंजा. जि. वाशिम

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी