शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
2
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
3
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
4
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
5
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
6
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
7
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
8
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
9
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
10
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
11
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
12
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
13
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
14
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
15
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
16
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
17
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
18
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
19
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
20
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?

शेतमालाच्या किमतीबाबत शेतक-यांत नाराजी

By admin | Updated: June 17, 2015 02:07 IST

शेती व्यवस्थापनापासून शेतकरी अनभिज्ञ ;एमआरपीपेक्षा खत व बियाण्यांचे जादा दर.

वाशिम : कमी पाऊस, अतवृष्टी, रोगराई, वन्यप्राण्यांचा हैदोस या सर्व कठीण परिस्थितीतून घरात आलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याची खंत ८७ टक्के शेतकर्‍यांनी ह्यलोकमतह्णच्या सर्वेक्षणादरम्यान व्यक्त केली. पीकपेरणीचा हंगाम लक्षात घेऊन ह्यलोकमतह्णतर्फे १६ जून रोजी ठराविक प्रश्नांवर शेतकर्‍यांचे सर्वेक्षण करण्यात आले. शेतीमध्ये आमुलाग्र बदल होत आहेत. या बदलामध्ये अनेक शेतकरी सहभागी होऊन अधिकाधिक उत्पादन घेत आहेत तर दुसरीकडे बरेच शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करीत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले. शेती व्यवस्थापनानुसार शेती करता काय? या प्रश्नावर ३६ टक्के शेतकर्‍यांनी होय असे उत्तर दिले तर ६४ टक्के शेतकर्‍यांनी नाही असे मत नोंदविले. शेतीत सिंचनाची सुविधा आहे काय? या प्रश्नावर ३९ टक्के शेतकर्‍यांनी सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे असे मत नोंदविले तर ६१ टक्के शेतकर्‍यांनी सिंचनाची सुविधा नसल्याचे मत नोंदविले. सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे ६१ टक्के शेतकर्‍यांनी सांगितले. कोरड्या दुष्काळाच्या पृष्ठभूमीवर शासनाने पाच टप्प्यात पीककर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश दिलेले आहेत. वाशिम जिल्ह्यात अद्याप पीककर्ज पुनर्गठण सुरू झाले नसले तरी याबाबत ३५ टक्के शेतकरी आशावादी आहेत तर ६५ टक्के शेतकर्‍यांनी पीककर्ज पुनर्गठणाच्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. पेरणीच्या वेळी पीककर्ज पुनर्गठण होणे आवश्यक असल्याचे या शेतकर्‍यांनी सांगितले. एमआरपीनुसार खते व बियाण्यांच्या किंमती आकारल्या जात नसल्याचे ४३ टक्के शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. ५७टक्के शेतकरी म्हणतात की एमआरपीनुसार किंमती आकारल्या जातात. राष्ट्रीयीकृत बँकांच्या पीककर्ज विलंबाबाबत ५४ टक्के शेतकरी नाराज असल्याचे दिसून आले. पीककर्ज वेळेवरच मिळायला हवे असे मत या शेतकर्‍यांनी नोंदविले आहे. शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई समाधानकारक नाही, असे ८८ टक्के शेतकर्‍यांना वाटते.