शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील २९ कुटुंबांना मिळाला शेतकरी अपघात विमा योजनेचा मदतीचा हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 20:13 IST

अपघात होऊन शेतक-याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे २ लक्ष रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. वाशिम जिल्ह्यात २९ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २ लक्ष रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे

ठळक मुद्देप्रत्येकी २ लक्ष रुपयांची आर्थिक मदत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पुरात वाहून जाणे, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात होऊन शेतकºयाचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे २ लक्ष रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. वाशिम जिल्ह्यात या योजनेतून १ डिसेंबर २०१५ पासून आतापर्यंत २९ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २ लक्ष रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे.घरातील कर्त्या पुरूषाचा अपघात झाल्यास उत्पन्नाचे साधन बंद होऊन कुटूंबात अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकºयास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा कालावधी १ डिसेंबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१७ असा असून दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकºयांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात आला आहे. त्यामुळे शेतकºयांना दोन लक्ष रुपयांचे अपघात विमा संरक्षण मिळाले आहे. अपघात होणाºया शेतकºयांचा विमा प्रस्ताव विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतरही ९० दिवसापर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे सादर करता येणार आहे. विम्याचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी १० ते ७५ वर्षे वयोगटातील व सातबाराधारक असणे आवश्यक आहे. अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येते, तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी