शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी रुग्णालयातील नेत्रशस्त्रक्रिया थांबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 11:42 IST

लॉकडाऊनच्या काळात आरोग्य विभागाने अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधित रुग्ण आणि संदिग्ध रुग्णांच्या उपचारार्थ तैनात असल्याने, कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया प्रभावित होत असल्याचे दिसून येते. गत अडीच महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाही नेत्र रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. नेत्र शस्त्रक्रियाचे रुग्ण शक्यतोवर वयस्क, मधूमेह, उच्च रक्तदाब आदी गटातील असल्याने तुर्तास शस्त्रक्रिया झाल्या नसल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने सांगितले.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र शासनाने २२ मार्चपासून लॉकडाऊन लागू केले. या लॉकडाऊनच्या काळात आरोग्य विभागानेसुद्धा अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या. त्याचा फटका नेत्र रुग्णांनाही बसल्याचे दिसून येते. नेत्र शस्त्रक्रिया थांबल्याने गोरगरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. दुसरीकडे नेत्र शस्त्रक्रियेचे रुग्ण शक्यतोवर वयस्क, अतिजोखमीच्या गटातील असल्याने आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कोरोनाबाधित तसेच संदिग्ध रुग्णांवर उपचार सुरू असल्याने, कोणताही धोका नको म्हणून नेत्रशस्त्रक्रिया या दरम्यान झाल्या नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला.

अत्यावश्यक आरोग्य सेवेला प्राधान्यकोरोनाच्या पृष्ठभूमीवर अत्यावश्यक आरोग्य सेवेला प्राधान्य दिले जात आहे. अत्यावश्यक असलेल्या शस्त्रक्रिया थांबविण्यात येत नाहीत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध प्रकारच्या नेत्रशस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कोरोनापूर्वी नियमित नेत्रशस्त्रक्रिया केल्याही जात होत्या. कोरोना विषाणू संसर्गाच्या कालावधीत नेत्र शस्त्रक्रियेसाठी रुग्णही शक्यतोवर येत नाहीत. संभाव्य कोणताही धोका म्हणून लॉकडाऊनच्या काळात नेत्र शस्त्रक्रिया झाल्या नाहीत. अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू आहेत.

- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल