शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भीषण पाणीटंचाई : जनावरांना लागणारे पाणीही घ्यावे लागतेय विकत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:22 IST

वाशिम : शेतीला सक्षम जोडधंदा म्हणून ओळखणारा जाणारा दुग्धव्यवसाय सद्या पुरता अडचणीत सापडला असून दुष्काळसदृष स्थिती आणि भीषण पाणीटंचाईमुळे जनावरे पोसणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात आजमितीस ३ लाखांपेक्षा अधिक पशूधन असल्याची नोंद जिल्हा पशूसंवर्धन विभागाकडे आहे. जिल्ह्यातील १३० पैकी १०० च्या वर सिंचन प्रकल्प कोरडेठाण्ण पडले. पशूपालकांनी आपल्या जनावरांसाठी लागणारे पिण्याचे पाणी चक्क विकत घेणे सुरू केले आहे.

वाशिम : शेतीला सक्षम जोडधंदा म्हणून ओळखणारा जाणारा दुग्धव्यवसाय सद्या पुरता अडचणीत सापडला असून दुष्काळसदृष स्थिती आणि भीषण पाणीटंचाईमुळे जनावरे पोसणे कठीण झाले आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे ग्रामीण भागातील जलस्त्रोत कोरडे पडल्याने दुधाळ जनावरांना पिण्याकरिता तथा त्यांच्या अंगावर घालण्याकरिता लागणारे पाणी पशुपालकांना चक्क विकत घ्यावे लागत आहे. होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत दुधाला अपेक्षित दर मिळत नसल्याने दैनंदिन नुकसान होत असल्याचा सूर पशुपालकांमधून उमटत आहे.जिल्ह्यात आजमितीस ३ लाखांपेक्षा अधिक पशूधन असल्याची नोंद जिल्हा पशूसंवर्धन विभागाकडे आहे. त्यापैकी दुधाळ गायी व म्हशींची संख्या १ लाख २८ हजार आहे. याआधारे जेमतेम शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायाची कास धरून आपला उदरनिर्वाह चालविला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्याच्या पर्जन्यमानात सातत्याने झालेली घट आणि विविध  स्वरूपातील नैसर्गिक संकटांमुळे शेतीसोबतच दुग्धव्यवसाय देखील धोक्यात सापडला आहे. यंदा तर जिल्ह्यातील १३० पैकी १०० च्या वर सिंचन प्रकल्प कोरडेठाण्ण पडले असून विहिरी, हातपंप, कुपनलिकांची पाणीपातळीही खोलवर गेल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. यामुळे जनजीवन विस्कळित झाले असून जनावरांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, केवळ दुग्धव्यवसायावरच उपजिविका अवलंबून असलेल्या काही पशूपालकांनी आपल्या जनावरांसाठी लागणारे पिण्याचे पाणी चक्क विकत घेणे सुरू केले आहे. ही स्थिती आगामी काही दिवसांमध्ये अधिकच गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुधाळ जनावरांना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत आहे. याशिवाय त्यांच्या अंगावरही पाणी घालावे लागते; अन्यथा त्यांच्यापासून मिळणाºया दुधावर परिणाम होतो. त्यामुळे अनेक पशूपालकांना खासगीत पाण्याचे टँकर विकत घेवून ही गरज भागवावी लागत आहे.- डॉ. भागवत महाले, पशूधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय दवाखाना, तांदळी-शेवई

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी