शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम, अकोला, धुळे व नंदूरबार जिल्हा परिषद सदस्यांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 13:11 IST

वाशिम : पाच वर्षांचा कालावधी ३० डिसेंबरला संपुष्टात येण्यापूर्वी ग्रामविकास विभागाने प्रशासक की मुदतवाढ यासंदर्भातील निर्णय २७ डिसेंबर रोजी रात्री उशिरा जाहिर केला असून, त्या अनुषंगाने वाशिम, अकोला, धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्याच यापुढे कार्यरत राहतील, असे स्पष्ट केले आहे. 

ठळक मुद्दे पाच वर्षांचा कार्यकाळ ३० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असल्याचा पृष्ठभूमीवर निवडणुकीचा कार्यक्रमही घोषित झाला होता. जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती.सदर चारही जिल्ह्यातील विद्यमान जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्या कार्यरत राहतील.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : पाच वर्षांचा कालावधी ३० डिसेंबरला संपुष्टात येण्यापूर्वी ग्रामविकास विभागाने प्रशासक की मुदतवाढ यासंदर्भातील निर्णय २७ डिसेंबर रोजी रात्री उशिरा जाहिर केला असून, त्या अनुषंगाने वाशिम, अकोला, धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्याच यापुढे कार्यरत राहतील, असे स्पष्ट केले आहे. 

डिसेंबर २०१३ मध्ये उपरोक्त चारही जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येत असलेल्या पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. पाच वर्षांचा कार्यकाळ ३० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असल्याचा पृष्ठभूमीवर निवडणुकीचा कार्यक्रमही घोषित झाला होता. परंतू, राखीव जागांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचा मुद्दा उपस्थित करून जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती. विद्यमान न्यायालयाने २७ आॅगस्ट २०१८ रोजी राज्य सरकारला अधिनियमातील तरतुदीत आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देत अकोला, वाशिम, नंदुरबार, धुळे जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राखीव जागांच्या तरतुदीच्या कलमात दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावावर शासनाचा कोणताच निर्णय झाला नाही. जिल्हा परिषद सदस्यांचा कालावधी ३० डिसेंबर २०१८ रोजी तर पंचायत समिती सदस्यांचा कालावधी २८ डिसेंबर २०१८ रोजी पूर्ण होत असल्याने त्यापुढील कालावधीत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टिने चारही जिल्हा परिषदांनी ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागविले होते. यावर निर्णय देताना, ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले की, उपरोक्त चारही जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्या सदस्यांचा विहित कालावधी संपुष्टात येत असल्याने अशा परिस्थितीत सदर चारही जिल्ह्यातील विद्यमान जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्या कार्यरत राहतील. या निर्णयामुळे विद्यमान जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना मुदतवाढ मिळाली असून, मोठा दिलासाही मिळाला. ग्रामविकास विभागाच्या या निर्णयाने जिल्हा परिषदेवर प्रशासक की मुदतवाढ यासंदर्भात असलेली संभ्रमावस्थाही संपुष्टात आणली आहे. मुदतवाढीसंदर्भातील पत्र जिल्हा परिषदांना प्राप्त 

वाशिम, अकोला, धुळे व नंदूरबार येथील विद्यमान जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना मुदतवाढ मिळाल्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने २७ डिसेंबरला जारी केलेले पत्र २८ डिसेंबरला सकाळच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना प्राप्त झाले आहे. विहित पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरच्या पुढील काळातही विद्यमान जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्या कार्यरत राहतील, यासंदर्भात ग्रामविकास विभागाने जारी केलेले पत्र प्राप्त झाले आहे, असे वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :washimवाशिमDhuleधुळेAkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदWashim ZPवाशीम जिल्हा परिषद