शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज नाकारल्यास बँकांना द्यावे लागणार स्पष्टीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 14:44 IST

   वाशिम : पीक कर्ज वाटपामध्ये सुसूत्रता आणणे तसेच पीक कर्ज वाटपाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या संकल्पनेतून पीक कर्जासाठी आॅनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्याला बँकेने कर्ज नाकारल्यास त्याबाबतचे स्पष्टीकरण बँकेला द्यावे लागणार आहे. आवश्यक कर्ज, सदर कर्ज कोणत्या बँकेतून पाहिजे, यासह इतर माहिती भरून नोंदणी करता येणार आहे. मोबाईलवर प्राप्त झालेल्या संदेशानुसार आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित शेतकऱ्याने आपण निवडलेल्या बँकेत संपर्क साधावा.

  वाशिम : पीक कर्ज वाटपामध्ये सुसूत्रता आणणे तसेच पीक कर्ज वाटपाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या संकल्पनेतून पीक कर्जासाठी आॅनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार बँकेत हेलपाटे मारण्याची आवश्यकता राहणार नाही. याशिवाय आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्याला बँकेने कर्ज नाकारल्यास त्याबाबतचे स्पष्टीकरण बँकेला द्यावे लागणार आहे. पीक कर्जाच्या आॅनलाईन नोंदणीसाठी सुरु करण्यात आलेल्या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, बचत खातेविषयक माहिती, आधार क्रमांक, त्यांच्याकडे असलेली शेतजमीन यासोबतच आवश्यक कर्ज, सदर कर्ज कोणत्या बँकेतून पाहिजे, यासह इतर माहिती भरून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केल्यानंतर टोकन क्रमांक व त्या कर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे, याविषयी माहिती शेतकºयांना मोबाईलवरच मिळणार आहे. तसेच कर्ज घेण्यासाठी जी बँक निवडली आहे, त्या बँकेकडे आॅनलाईन स्वरुपात शेतकऱ्यांची कर्ज मागणी नोंदविली जाणार आहे.आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मोबाईलवर प्राप्त झालेल्या संदेशानुसार आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित शेतकऱ्याने आपण निवडलेल्या बँकेत संपर्क साधावा. यावेळी बँकेतील विहित नमुन्यातील अर्ज भरून देणे व कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. या अर्जावर बँकेकडून पुढील कार्यवाही करून पीक कर्ज मंजूर केले जाईल. एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज काही कारणास्तव नामंजूर करण्यात आल्यास त्याविषयीचे स्पष्टीकरण बँकेला पीक कर्जविषयक संकेतस्थळावर द्यावे लागणार आहे. कर्ज नाकारण्याचे कारण अयोग्य असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बँकेकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे कळविण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमbankबँकFarmerशेतकरी