शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

टरबूज, पपईच्या मिश्र लागवडीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:16 IST

वाशिम: रिसोड तालुक्यातील धुमका येथील शेतकरी अनिल धुळे यांनी १० एकर क्षेत्रात मल्चिंगवर पपई आणि टरबुजाची मिश्र लागवड करण्याचा प्रयोग केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: रिसोड तालुक्यातील धुमका येथील शेतकरी अनिल धुळे यांनी १० एकर क्षेत्रात मल्चिंगवर पपई आणि टरबुजाची मिश्र लागवड करण्याचा प्रयोग केला आहे. आता ही पिके चांगली बहरली असून, यातून ५५ लाख रुपये उत्पन्न मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.  अलिकडच्या काळात आधुनिक पद्धतीचा अवलंब करून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यात शेतकरी यशस्वी होत आहेत. बरेचदा शेतकºयांकडे मुबलक पाणी असतानाही शेतीतून फारसे उत्पन घेता येत नाही. आवश्यक व्यवस्थापनाअभावी त्यांनी केलेला खर्चही वसुल होत नाही; परंतु याला काही शेतकरी अपवाद आहेत. त्यात धुमका येथील शेतकरी अनिल धुळे यांचा समावेश असून, ते सतत विविध प्रयोग करून भरघोस उत्पन्न घेत आहेत. त्यांनी यंदा त्यांच्या एकुण शेतीपैैकी १० एकर क्षेत्रात मल्चिंग पद्धतीने पपई आणि टरबुजाची मिश्र लागवड केली आहे. यामुळे क्षेत्र, खर्च कमी झाला असून, पाण्याचीही बचत होणार आहे. गेल्या २० दिवसांपूर्वी त्यांनी ही लागवड केली असून, मे महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांना टरबुजाचे उत्पन्न मिळू शकणार आहे. टरबुजातून एकरी २.५० टन प्रमाणे एकूण २५ टन उत्पादनातून किमान २५ लाख, तर पपईतून ३० लाखांचे उत्पन्न मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आता त्यांची ही पिके चांगलीच बहरली असून, इतर शेतकºयांनाही त्यांचा हा प्रयोग आकर्षित करीत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती