शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

३६ जिल्ह्यांमधील ५ हजार चित्रांच्या प्रदर्शनास वाशिममध्ये प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 14:39 IST

३६ जिल्ह्यांमधील ५ हजार चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आलेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या शांतीलाल मुथा फाऊंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पाटणी कर्मशियल कॉम्प्लेक्स येथे मुल्यवर्धन शिक्षणावर आधारीत तीनदिवसीय राज्यस्तरीय चित्रप्रदर्शनीचे २५ फेब्रुवारी रोजी संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उपक्रमांतर्गत ३६ जिल्ह्यांमधील ५ हजार चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आलेले आहे.उद्घाटन कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, डायट प्राचार्य प्रमिला खरटमोल, प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, हॅप्पी फेसेस शिक्षण संस्थेचे संचालक दिलीप हेडा, जेष्ठ अधिव्याख्याता क्रांती कुलकर्णी, पवार, मुल्यवर्धन जिल्हाप्रमुख बागरेचा, सहप्रमुख निलेश सोमाणी, कार्यक्रम अधिकारी मंगेश गवई, युनिक कोचिंग क्लासेसचे प्रा. अतुल वाळले, प्रा. माधव पाटील, मुल्यवर्धन जिल्हा समन्वयक विठोबा काटेकर, राज्य समन्वयक राजेश देशलहरा, मास्टर ट्रेनर अमोल हांडगे, तालुका समन्वयक निलेश शिरभाऊ, लक्ष्मण ब्राम्हण, मोहम्मद मुजफ्फीर आदिंची उपस्थिती होती.पुणे येथील शांतीलाल मुथा फाऊंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या ५०० शाळांमध्ये मुल्यवर्धन शिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांनी आपल्या अभिनव संकल्पना चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून रेखाटल्या आहेत. संपूर्ण राज्यातील संकल्पीत केलेल्या संकल्पना या प्रदर्शनीमध्ये मांडण्यात आलेल्या आहेत. २५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ही प्रदर्शनी सर्वांसाठी खुली असून शिक्षक, विद्यार्थी, पालक व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.(शहर प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिम