शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पीकनुकसानाची तक्रार नोंदविण्यासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 15:17 IST

Agriculture News. Washim शेतकरी या संदर्भात पीकविमा कंपनीकडे तक्रार करण्याची धडपड करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मागील दोन दिवसापासून पश्चिम वºहाडातील काही भागांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे पिकांचे नुकसान झाले असून, ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. ते शेतकरी या संदर्भात पीकविमा कंपनीकडे तक्रार करण्याची धडपड करीत आहेत. तथापि, ही तक्रार नोंदविण्यासाठी सुचविलेले मोबाईल अ‍ॅप्लिकेशन नेटवर्कअभावी डाऊनलोड होण्यात अडचणी येत आहेत, टोल फ्री क्रमांकावर संपर्क होण्यात अनेक शेतकºयांना अडचणी येत आहेत.खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आहे. काही शेतकºयांनी सोयाबीन सोंगून शेतात वाळवण्यासाठी तसेच ठेवले, तर काहींनी सुड्या लावून ठेवल्या आहेत. परतीच्या पावसामुळे हे सोयाबीन भिजल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. यात ज्या शेतकºयांनी पीकविमा उतरविला. त्या शेतकºयांना ७२ तासांत पीकविमा कंपनी किंवा कृषी विभागाकडे तक्रार नोंदविण्याची सूचना करण्यात आली आहे. तथापि, ही तक्रार ७२ तासांच्या आत नोंदविणे आवश्यक असून, त्यासाठी शेतकºयांनी गूगल प्ले स्टोअरवरून क्रॉप इन्शूरन्स हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्यात नुकसानाची माहिती देणे, संबंधित पीकविमा कंपनी अथवा उपलब्ध करून दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर, तसेच संबंधित जिल्हा कृषी विभागाच्या ई-मेलवर अर्ज करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेबाबत शेतकºयांना पुरेसे ज्ञान नाही, तसेच ग्रामीण भागांत इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभावही असल्याने तक्रार कशी करावी, असा प्रश्न अनेक शेतकºयांपुढे उपस्थित झाला आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती