शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कप स्पर्धेच्या पुरस्काराबाबत उत्सूकता; वाशिम जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 15:42 IST

वाशिम: वॉटर कप स्पर्धा २०१८ चा पुरस्कार वितरण सोहळा १२ आॅगस्ट रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, वाशिम जिल्ह्यातून स्पर्धेत सहभागी झालेल्या ५५ गावांना या सोहळ्याची उत्सूकता लागली आहे. 

ठळक मुद्देसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ मध्ये महाराष्ट्रातल्या ७५ तालुक्यांमधील ४००० हजार पेक्षा अधिक गावांनी सहभाग घेतला होता. यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्याची निवड झाली होती.वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातून उत्कृष्ट कामगिरी करणाºया गावास तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वॉटर कप स्पर्धा २०१८ चा पुरस्कार वितरण सोहळा १२ आॅगस्ट रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, वाशिम जिल्ह्यातून स्पर्धेत सहभागी झालेल्या ५५ गावांना या सोहळ्याची उत्सूकता लागली आहे. पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ मध्ये महाराष्ट्रातल्या ७५ तालुक्यांमधील ४००० हजार पेक्षा अधिक गावांनी सहभाग घेतला होता. या गावांतील लाखो ग्रामस्थांनी ४५ दिवस जलसंधारणाच्या कामांसाठी श्रमदान करून कोट्यवधी लिटर पाणी साठविण्याची क्षमता निर्माण केली. या सर्व वॉटर हिरोजना मानवंदना देण्यासाठी आणि स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्यासाठी पाणी फाऊंडेशनने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान यांच्यासह कला, राजकारण व उद्योग क्षेत्रातील मातब्बर मंडळी उपस्थित राहणार आहे. दरम्यान, यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्याची निवड झाली होती. या दोन्ही तालुक्यांतील ५५ गावांनी स्पर्धेत सक्रीय सहभाग घेऊन श्रमदानाच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातून उत्कृष्ट कामगिरी करणाºया गावास तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे, तर संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाºया गावाला स्पर्धेचा विजेता म्हणून घोषीत केले जाणार आहे. त्यामुळे मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातून वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांतून कोणाला तालुकास्तरीय पुरस्कार मिळतो किंवा स्पर्धेचा विजेता, उपविजेता म्हणून एखाद्या गावाची निवड होते काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी संबंधित मंडळींना आमंत्रित करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाKaranjaकारंजाMangrulpirमंगरूळपीर