शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लस सर्वांनाच मिळणार - राजेश टोपे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 10:32 IST

Rajesh Tope, corona vaccine News टप्प्याटप्प्याने सर्वांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

ठळक मुद्दे'सिरम' व 'बायोटेक'ला परवानगी देण्याबाबत केंद्राकडे प्रस्ताव सादर केलेला आहे, असे ते म्हणाले. राज्यातील चार जिल्ह्यात ट्राय रनचे आयोजन करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  आरोग्य मंत्रालयाने राज्यातील केवळ एकाच जिल्ह्यात ट्रायल रन घेण्याचे ठरविले होते; परंतु त्यामध्ये वाढ करून आम्ही आता चार जिल्ह्यांचा समावेश केला आहे. प्रथम अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.शहरातील बालाजी मंदिर येथे १ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्यासमवेत विधीवत पूजा केली. यावेळी ते बोलत होते. २०२० हे वर्ष कोरोनाग्रस्त होते; मात्र नवीन वर्ष कोरोनामुक्त व्हावे, अशी देवाकडे प्रार्थना केली. कोरोनाविरोधात सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असून २ जानेवारी रोजी राज्यातील चार जिल्ह्यात ट्राय रनचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने राज्यातील केवळ एकाच जिल्ह्यात सदर उपक्रम घेण्याचे ठरविले होते. आता त्यात वाढ करून चार जिल्ह्यांचा समावेश केला. 'ड्राय रन'च्या माध्यमातून लससंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. प्रथमत: यामध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना प्राधान्य राहील. त्यानंतर टप्याटप्याने सर्वांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. यासंदर्भात 'सिरम' व 'बायोटेक'ला परवानगी देण्याबाबत केंद्राकडे प्रस्ताव सादर केलेला आहे, असे ते म्हणाले. यावेळी सरपंच संघटनेचे चंद्रकांत पाकधने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, भास्कर पाटील शेगीकर, जुगलकिशोर कोठारी, सचिन रोकडे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आरोग्यमंत्र्यांनी पोहरादेवीतही घेतले दर्शनआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नववर्षानिमित्त १ जानेवारी रोजी पोहरादेवी संस्थानला भेट दिली. तसेच महान तपस्वी स्वर्गीय संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

टॅग्स :washimवाशिमRajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्या