शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज -  पाटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 16:50 IST

वाहतूक नियमांच्या पालनाची सुरुवात प्रत्येकाने आपल्या कुटुंबापासून करावी, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटणी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रत्येक वाहनधारकाचा प्रवास सुरक्षित व सुकर होण्यासाठीच वाहतूक विषयक नियम व कायदे बनविले गेले आहेत. या नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्त्यव्य आहे. वाहतूक नियमांच्या पालनाची सुरुवात प्रत्येकाने आपल्या कुटुंबापासून करावी, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटणी यांनी केले. वाशिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आयोजित ३१ वा रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जिल्हाधिकारी  मोडक म्हणाले, रस्ता सुरक्षा हा अतिशय महत्वाचा विषय आहे, त्यामुळे याविषयी जनजागृतीसाठी रस्ता सुरक्षा सप्ताह देशभर राबविला जात आहे. अतिशय क्षुल्लक कारणांसाठी वाहतूक नियम तोडून वेगाने वाहने चालविणे, सिग्नल तोडणे यासारखे प्रकार केले जातात. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होणारे अपघात अनेकदा आपल्या व इतरांच्याही जीवावर बेतू शकतात. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.  पोलीस अधीक्षक  परदेशी म्हणाले की, रस्त्यावर वाहन चालवताना होणारी एक चूक वाहनधारकाच्या जीवावर बेतते. त्यामुळे रस्ता सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. प्रास्ताविक प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी केले. यावेळी त्यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या आयोजनाचा हेतू सांगितला. तसेच ११ ते १७ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच वाहतूक नियमांची माहिती देणारी भिंतीपत्रके, घडीपुस्तिका यांचे विमोचन करुन वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. हेल्मेटचे महत्व पटवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीला यावेळी उपस्थितांनी हिरवी झेंडी दाखविली. बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी रस्ता सुरक्षा विषयी पथनाट्य सादर करून वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली. यावेळी सेल्फी पॉईंट, बाईक रॅली आकर्षण ठरली.

टॅग्स :washimवाशिमroad safetyरस्ते सुरक्षाRajendra Patniराजेंद्र पाटणीTrafficवाहतूक कोंडी