शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु राहणार अत्यावश्यक सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 13:17 IST

Washim News : सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु राहणार अत्यावश्यक सेवा

संचारबंदीचा सुधारीत आदेश जारी : दवाखाने, मेडीकल्स २४ तास सुरू राहणारवाशिम : शहर व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला असून, जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी संचारबंदीचा सुधारीत आदेश १८ एप्रिलला जारी केला असून, त्यानुसार दवाखाने, मेडीकल्स वगळता इतर सर्व अत्यावश्यक सेवा सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. त्यानंत दुकाने उघडी ठेवल्यास कोविड-१९ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. संचारबंदी लागू असतानाही, अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने परिस्थिती जैसे थे होती. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणखी कठोर पाऊल उचलत संचारबंदीच्या नियमात बदल करीत सुधारीत आदेश जारी केला. या आदेशानुसार मेडीकल व दवाखाने वगळता अत्यावश्यक सेवेतील उर्वरीत सर्व दुकाने केवळ चार तासांसाठी सुरू ठेवता येणार आहेत तर दुसरीकडे अत्यावश्यक बाबीतील सर्व हार्डवेअर्सची दुकाने व कृषि संबंधित सर्व दुकाने, आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना कृषि संबंधित साहित्याची आवश्यकता असेल त्यांनी संबंधित दुकानदार यांच्याशी दूरध्वनीद्वारे मागणी नोंदवून संबंधित ग्राहकाने स्वत: ही वस्तू दुकानातून घेवून जावी. केवळ त्या वेळेपुरते दुकान उघडता येईल. इतर कोणत्याही परिस्थितीत दुकानदार यांनी दुकानातून मालाची विक्री करू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दजार्पेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे. नागरिकांनी संचारबंदीच्या सुधारीत आदेशाचे पालन करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले.दूध संकलन व विक्रीला मुभा दुध संकलन व विक्रीकरिता सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत मुभा राहील. दुध व्यावसायिकांना दुध वितरणासाठी सकाळी ८ पूर्वी शहरामध्ये येता येईल, तसेच सायंकाळी ७ वाजेनंतर घरी जावू शकतील. मात्र त्यांच्याकडे दुधाची कॅन सोबत असणे आवश्यक आहे.आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत असलेली कार्यालये २४ तास सुरूआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत असलेली कार्यालये, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, पाणी पुरवठा, नगरपालिका व विद्युत वितरण कंपनीची कार्यालये २४ तास सुरु ठेवण्यास मुभा राहील. जिल्ह्यातील इतर सर्व कार्यालये, बँका, एटीएम, विमा कार्यालये सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु राहतील.शहरातील पेट्रोलपंप चार तास सुरू राहतील !शहरातील व गावातील पेट्रोलपंप सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु राहतील. हायवेवर शहराबाहेर व गावाबाहेर असलेले पेट्रोलपंप २४ तास सुरु ठेवण्यास मुभा राहील. खाजगी वाहतूक सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु राहील. सार्वजनिक वाहतूक नियमितपणे सुरु राहील.प्रतिबंधित क्षेत्रातील इतर दुकाने बंद !प्रतिबंधित क्षेत्रामध्ये केवळ दवाखाने, मेडिकल, किराणा दुकान, भाजीपाला व फळांची दुकाने, डेअरी, मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने सुरु राहतील, इतर सर्व दुकाने बंद राहतील. परवानगी देण्यात आलेल्या सर्व दुकानांना १४ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.
टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस