शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी ग्रामसभांबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 18:25 IST

वाशिम: निवासी प्रयोजनासाठी केलेले जानेवारी २०११ पर्यंतचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. यासाठी ग्रामपंचायतींना ग्रामसभेत निर्णय घेण्याचे अधिकारी असले तरी, ही प्रक्रिया संथ आहे.

ठळक मुद्देशासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे ठरविले आहे. अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर सादर करावयाचे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: निवासी प्रयोजनासाठी केलेले जानेवारी २०११ पर्यंतचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. यासाठी ग्रामपंचायतींना ग्रामसभेत निर्णय घेण्याचे अधिकारी असले तरी, ही प्रक्रिया संथ आहे. याची दखल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घेत गटविकास अधिकाºयांना पत्र पाठविले आहे. या पत्रानुसार निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी आॅगस्ट महिन्यात ग्रामसभा घेण्याबाबत ग्रामपंचायतींना कळविण्याच्या सुचना त्यांनी केल्या आहेत. राज्य शासनाने १६ फेब्रुवारी २०१८ च्या निर्णयानुसार शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे ठरविले आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी ग्रामसभांचे आयोजन करून त्यांच्या क्षेत्रातील निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर सादर करावयाचे आहेत; परंतु ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या मागणीसाठी वारंवार आंदोलन, उपोषण करणाºया  सत्यमेव जयते फाऊंडेशन या संस्थेच्यावतीने १० आॅगस्ट रोजी निवेदनाद्वारे याकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे लक्ष वेधले. आॅगस्ट महिन्यातच याबाबत ग्रामसभा घेण्याच्या सुचना ग्रामपंचायतींना देण्याची मागणीही या स्वयंसेवी संस्थेने केली आहे. त्यांच्या मागणीची दखल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घेतली आहे. याबाबत त्यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाºयांना ११ आॅगस्ट रोजी पत्र पाठविले.  निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत आॅगस्ट महिन्यातील ग्रामसभांत प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविण्याच्या सुचना त्यांनी या पत्राद्वारे दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद