शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहरात अतिक्रमण होतेय पूर्ववत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 15:10 IST

फूटपाथवर काही व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटल्याचे चित्र वाशिम शहरात दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील अतिक्रमण मोठया प्रमाणात काढण्यात आले. यापूर्वी कधी न काढण्यात आलेले अतिक्रमण प्रथमच काढण्यात आले. परंतु गत दोन ते तीन दिवसांपासून शहरातील काही भागात अतिक्रमण पूर्ववत होताना दिसून येत आहे. याकडे नगरपरिषदेने लक्ष देणे गरजेचे आहे.वाशिम शहरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे अतिक्रमण व शहरातील अस्ताव्यस्त वाहतूक होती. वाशिम शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक राजू वाटाणे व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी दोन्हीही समस्या निकाली काढल्यात याबाबत नागरिकांतून कौतूक होत आहे. परंतु गत दोन दिवसांपासून शहरातीलफूटपाथवर काही व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटल्याचे चित्र वाशिम शहरात दिसून येत आहे. तसेच पाटणी चौक ते शिवाजी चौक पूर्णपणे फेरीवाल्यांपासून मुक्त झाला असला तरी रिसोड नाक्यावर या लघुव्यावसायिकांनी आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे आता त्या रस्त्यावर वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शहरातील अतिक्रमण हटाव मोहीमेव्दारे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले परंतु अद्याप अनेक ठिकाणचे अतिक्रमण अद्याप बाकी दिसून येत आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाने लक्ष देऊन शहर अतिक्रमण मुक्त करणे गरजेचे झाले आहे.  या भागात होत आहे अतिक्रमणवाशिम शहरातील मुख्य रस्त्यावरील हटविण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते मोकळे झाले होते परंतु ज्या ठिकाणचे अतिक्रमण हटविण्यात आले होते तेथे लघुव्यावसायिकांनी तात्पुरते आपले उद्योग सुरु करुन अतिक्रमण सुरु केले आहे. यामध्ये प्रामुख्याने रिसोड नाका, पाटणी चोैक ते आंबेडकर चौक, पुसद नाकासह इतरही ठिकाणचा समावेश आहे. आंबेडकर चौकातील फूटपाथ पूर्णपणे रिकामी झाली होती. परंतु आता हळूहळू येथे अतिक्रमण पूर्ववत होताना दिसून येत आहे. सुरुवातीला अतिक्रमण हटविल्यानंतर काही दिवसापर्यंत त्या ठिकाणची पाहणी करण्यात आली. तोपर्यंत अतिक्रमण झाले नव्हते परंतु सद्यस्थितीत अतिक्रण होताना दिसून येत आहे.

शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम पारदर्शीपणे राबविण्यात आली आहे. जेथे जेथे अतिक्रमण दिसून आले तेथील अतिक्रमण काढण्यात आले आहे. काही ठिकाणी अतिक्रमण राहिले असल्यास तेही नक्कीच काढण्यात येणार आहे. नागरिकांनी, लघुव्यावसायिकांनी सुध्दा अतिक्रमण मोहीमेला सहकार्य करावे व अतिक्रमण करुन शहराला बेताल बनवू नये. आपले शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करावे.- दीपक मोरेमुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम

 

टॅग्स :washimवाशिम