शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील अतिक्रमण हटले; वाहतुकीसाठी रस्ता खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 16:38 IST

 वाशिम : हिंगोली नाका ते रेल्वे गेट या कृषी उत्पन्न बाजार समितीजवळून जाणाºया रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : हिंगोली नाका ते रेल्वे गेट या कृषी उत्पन्न बाजार समितीजवळून जाणाºया रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. स्थानिक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त रविवार, २ जून रोजी मंगरूळपीर, पूसदकडून येणारी वाहतूक याच मार्गाने बसस्थानक तसेच हिंगोलीकडे वळती केली होती.हिंगोलीवरून येणारी वाहतूक एकेकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीजवळून जाणाºया हिंगोली नाका ते रेल्वे गेट या रस्त्यावरून वळती केली जात होती. जुने शहरातील शेतकरी व नागरिकांनादेखील पुसद नाक्याचा फेरा न घालता जुना बाहेती ले-आउट जवळून गेलेल्या या रस्त्याने शेतात व रेल्वेगेटकडे जाणे सोयीचे होते. मध्यंतरीच्या काळात मात्र या रस्त्याचा काही भाग अतिक्रमणाने गिळंकृत केल्याने या रस्त्यावरील वर्दळ कमी झाली. कालांतराने अतिक्रमण वाढत गेले आणि हिंगोली नाका ते रेल्वे गेटकडे कमी अंतर व वेळेत येणारा हा रस्ताच स्वत:च्या अस्तित्वासाठी धडपडू लागला.  दरम्यानच्या कालावधीत सदर प्रकरण न्यायप्रविष्ठदेखील झाले होते. मंजूर नकाशाप्रमाणे या रस्त्याचे काम करण्याचा निर्णय झाल्याने त्यानुसार रस्ता काम करण्यात आले. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले होते, हे विशेष. रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यानंतर सदर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. रेल्वेगेटजवळील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त २ जून रोजी मंगरूळपीर, पुसद, शेलुबाजार मार्गाकडून येणारी वाहतूक याच वळणमार्गाने बसस्थानक, हिंगोलीकडे वळती केली होती.

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका