शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांनी नोंदवली सामूहिक बदल्यांची मागणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 18:32 IST

वाशिम : स्थानिक जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाºयांना विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी हिन दर्जाची वागणूक देवून मोठा गोंधळ घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाºयांना विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी हिन दर्जाची वागणूक देवून मोठा गोंधळ घातला. काही कर्मचाºयांना दमदाटी करून मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. १ मार्च रोजी घडलेल्या या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कर्मचाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे २ मार्चला निवेदन सादर करून सामुहिक बदल्यांची मागणी नोंदवली आहे. यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली.यासंदर्भातील निवेदनात कर्मचाºयांनी नमूद केले आहे, की जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी आढावा सभेची माहिती तयार करित असताना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याठिकाणी येवून जिल्हा परिषद सदस्य गवळी यांनी वरिष्ठ सहायक गणेश झ्याटे यांच्या टेबलवर असलेल्या विविध योजनांतर्गत कामांच्या निविदा नस्ती व टिप्पणी काढून नेण्याच्या प्रयत्न केला.  सदर कागदपत्रे तपासणी करून २ मार्चला सकाळी १० वाजता पुरविण्यात येतील, असे त्यांना सांगितले. मात्र, गवळी यांनी कर्मचाºयांना दमदाटी करून शिविगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी भयभीत झाले आहेत. सदर घटनेचे ‘सीसीटीव्ही फुटेज’ देखील उपलब्ध असून याबाबत सखोल तपासणी करून ठोस कार्यवाही करण्यात यावी; अन्यथा सर्व कर्मचाºयांच्या सामूहिक बदल्या कराव्या. याप्रकरणी कार्यवाही न झाल्यास सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन पुकारतील, असा इशाराही संबंधित कर्मचाºयांनी दिला आहे. निवेदनावर बांधकाम विभागातील कर्मचारी डी.जी. देशमुख, बी.आर. राजस, जी.आर. इंगोले, बी.डी. गवळी, आर.जी. भारती, एस.एच. बनसोड, पी.एस. बेलोकार, जी.यू. झ्याटे, आर.डी. भेजगे, वी.म. मिसाळ, जी.बी. मोडकर, गजानन भुतकर, एच.के. वाघ आदिंच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद