शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या सण अग्रीम मर्यादेत अडीच हजारांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच सण अग्रिम मर्यादेत २३ आॅक्टोबर रोजी अडीच हजार रुपयांची वाढ ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच सण अग्रिम मर्यादेत २३ आॅक्टोबर रोजी अडीच हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याने येत्या दिवाळीला १२५०० रुपये अग्रिम मिळणार आहे. त्याअनुषंगाने कर्मचाऱ्यांनी बुधवारपासूनच नियोजनला सुरूवातही केल्याचे दिसून आले. विविध सण, उत्सवादरम्यान पैशाची आगाऊ तरतूद व्हावी याकरीता शासनातर्फे अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सण अग्रीम दिला जातो. गतवर्षापर्यंत ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन ४८०० रुपयांपेक्षा अधिक नाही, अशा कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये सण अग्रीम दिला जात होता. यामध्ये वाढ करण्याची मागणी विविध कर्मचारी व अधिकारी महासंघ व संघटनांनी राज्य शासनाकडे केली होती. या मागणीची सकारात्मक दखल घेण्यात आली असून, अडीच हजार रुपयांची वाढ केली आहे. येत्या दिवाळीपूर्वी ४८०० रुपयांपेक्षा अधिक ग्रेड वेतन नाही अशा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना १२५०० रुपये सण अग्रीम मिळणार आहे. वर्षातील १० सणांसाठी ही अग्रिम देण्यात येते. यामध्ये दिवाळी, रमझान ईद, ख्रिसमस, पारसी नववर्ष, संवत्सरी, रोश-होशना, वैशाखी पौर्णिमा अर्थात बुद्ध जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा समावेश आहे. आगामी दिवाळीचा सण लक्षात घेता जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय यासह अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचाºयांनी सण अग्रिमचा लाभ घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू केल्याचे बुधवारी दिसून येते. दरम्यान, सण अग्रिम मर्यादेत वाढ करण्याची मागणी कर्मचारी महासंघ, संघटनांनी केली होती. आता यामध्ये वाढ झाल्याने याचा फायदा कर्मचाºयांना मिळणार आहे, असे जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव रुपेश निमके, जि.प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय धुमाळे, जिल्हा सचिव हरिनारायण परिहार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :washimवाशिमEmployeeकर्मचारी