शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील तीन हजारांवर ग्राहकांचा विद्यूत पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 13:22 IST

५० हजारांपेक्षा अधिक ग्राहकांकडे १२ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक विद्यूत ग्राहकांकडे १८ कोटींची थकबाकी आहे. सदर रक्कम ‘मार्च एन्डींग’पूर्वी वसूल करण्याचे वरिष्ठ स्तरावरून फर्मान सुटले आहे. त्यानुसार, जिल्ह्यात महावितरणनची टीम कामाला लागली असून धडक कारवाईची मोहीम हाती घेऊन देयक थकविणाऱ्या सुमारे तीन हजार ग्राहकांचा विद्यूत पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी शनिवार, २२ फेब्रूवारी रोजी दिली.जिल्ह्यात घरगुती विज वापर करणाºया ग्राहकांची संख्या १ लाख ८० हजार असून त्यापैकी ५० हजारांपेक्षा अधिक ग्राहकांकडे १२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यासह वाणिज्यिक स्वरूपात वीज वापर करणाºया ग्राहकांकडे ४.१४ कोटी रुपये, औद्योगिक स्वरूपात वीज वापर करणाºया ग्राहकांकडे १.८६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही रक्कम वसूल करित असताना महावितरणची दमछाक होत असून वारंवार पाठपुरावा करूनही ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अखेर कठोर पावले उचलत कारवाईचा धडाका अवलंबिण्यात आला आहे. त्यानुसार, अधिक थकबाकी असलेल्या ३ हजारांपेक्षा अधिक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. जे लाईनमन थकबाकी वसूलीकडे दुर्लक्ष करित आहेत, त्यांच्यावरही कारवाई केली जात असल्याची माहिती कार्यकारी अभियंता तायडे यांनी दिली.पाणीपुरवठा योजनांचा विजपुरवठाही होणार खंडितजिल्ह्यातील ४९१ पैकी ४४३ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांना महावितरणकडून वीज पुरविली जाते. त्यातील २५८ ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेचे विद्यूत देयक अदा केलेले नाही. प्रलंबित असलेली विद्यूत देयकांची रक्कम मार्च २०१९ पुर्वी अदा न केल्यास पाणीपुरवठा योजनांचा विजपुरवठाही खंडित केला जाईल, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी सांगितले.

वाढतच चाललेल्या विद्यूत थकबाकीमुळे महावितरण आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहे. ही बाब लक्षात घेवून थकबाकीदार ग्राहकांवर थेट कारवाईची मोहिम अवलंबिण्यात आली. याकामी दिरंगाई करणाºया महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही ताकीद देण्यात आली आहे. वसूलीकडे दुर्लक्ष करणाºया कर्मचाºयांवरही कारवाई होणार आहे.- आर.जी. तायडेकार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण