शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंप जोडणीविनाच आकारले वीज देयक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 12:30 IST

देपूळ (वाशिम ): शेतामध्ये कूपनलिका खोदून महावितरणकडे २०१५ ला वीजजोडणीसाठी रितसर अर्ज करून कोटेशनही भरल्यानंतर शेतकऱ्याला वीज जोडणी तर मिळाली नाहीच, उलट त्या शेतकऱ्यांना वीज वापरापोटी ९९६० रुपयांचे देयक आकारण्याचा प्रकार महावितरणने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क देपूळ (वाशिम ): शेतामध्ये कूपनलिका खोदून महावितरणकडे २०१५ ला वीजजोडणीसाठी रितसर अर्ज करून कोटेशनही भरल्यानंतर शेतकऱ्याला वीज जोडणी तर मिळाली नाहीच, उलट त्या शेतकऱ्यांना वीज वापरापोटी ९९६० रुपयांचे देयक आकारण्याचा प्रकार महावितरणने केला आहे. देपूळ येथील अर्जदार शेतकरी शंकर डिगांबर गंगावणे महावितरणच्या या प्रकारामुळे अवाक झाले आहेत. देपूळ येथील शंकर डिगांबर गंगावणे यांनी २०१५ ला आपल्या शेतात कूपनलिका खोदली आणि या कूपनलिकेच्या आधारे सिंचन करण्यासाठी महावितरणच्या वाशिम उपविभागीय कार्यालयाकडे २०१५ ला ६२०० रुपये कोटेशन भरले. त्यांना काजळांबा शिवारात वीज पुरवठा हवा होता; परंतु गत तीन वर्षापासून त्यांना वीज जोडणी मिळाली नाही. उलट महावितरण कंपनीकडून ३२८९६०००२३६ या ग्राहक क्रमांकानुसार ९९६० रुपयांचे देयकच पाठविले. या प्रकारामुळे शंकर गंगावणे अवाक झाले आणि त्यांनी २२ जानेवारी रोजी याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रार करून या प्रकाराची चौकशी करण्यासह तात्काळ वीज जोडणी देण्याची मागणी केली आहे. 

 मंगरुळपीर तालुक्यातही घडला होता असा प्रकारवाशिम तालुक्यातील देपूळ येथील शेतकºयाला कृषीपंप जोडणीपूर्वीच वीज देयक देण्याचा जो प्रकार घडल असाच प्रकार गतवर्षी मंगरुळपीर उपविभागांतर्गत घडला होता. मंगरुळपीर तालुक्यातही एका शेतकºयाला वीज जोडणी देण्यापूर्वीच त्याच्या नावे वीज देयक आकारण्याचा प्रकार महावितरणकडून करण्यात आला होता. वारंवार घडणाºया या प्रकारामुळे महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे शेतकरी मात्र चांगलेच संभ्रमात पडले आहेत. 

  वीज जोडणी न देताच शेतकºयाला वीजदेयक आकारण्याचा प्रकार, ही गंभीर बाब आहे. वाशिम उपविभागीय अभियंत्यांकडून यची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.  .- व्ही.बी. बेथारियाकार्यकारी अभियंता, महावितरण

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण