शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

देपूळ येथे दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 15:08 IST

देपूळ (वाशिम) : येथील सिंगल फेज रोहित्र नादुरुस्त असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ (वाशिम) : येथील सिंगल फेज रोहित्र नादुरुस्त असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसाला केवळ तीन तास वीज पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करीत आहेत. महावितरण मात्र, या समस्येचे निराकरण करण्याची तसदी घेत नसल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. देपुळ येथील वीजग्राहकांना सिंगल फेज रोहित्रावरून वीज पुरवठा होतो. या रोहित्रावर दाब वाढल्याने ते २ महिन्यांपासून या रोहित्रात वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा खंडीत होत आहे. दिवसा आणि रात्रीच्या २४ तासांत मिळून वीजग्राहकांना केवळ ३ तास वीज पुरवठा मिळत आहे. वीज पुरवठ्याअभावी वीजेवर आधारीत लघू व्यवसाय ठप्प झाले असून, ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत आहे. गृहिणीही अनियमित वीज पुरवठ्याने त्रस्त झाल्या आहेत. गावातील विजेची समस्या निकाली काढण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार महावितरणकडे मागणीही केली; परंतु त्याची दखल अद्यापही घेण्यात आली नाही.

 देयक न भरण्याच्या इशाºयाकडेही दुर्लक्ष देपूळ येथे २ महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. त्यामुळे वीजग्राहक गजानन वाघमारे यांच्या नेतृत्वात इतर ग्राहकांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता तायडे आणि उपविभागीय अभियंता जांभुळकर यांची २२ नोव्हेंबर रोजी भेट घेत ही समस्या निकाली काढण्याची मागणी केली आणि दखल न घेतल्यास वीजदेयक अदा न करण्याचा इशाराही दिला. या प्रकाराला १८ दिवस उलटले तरी, महावितरणने या समस्येचा निपटारा केला नाही. त्यामुळे ग्रामस्थांत संतापाची मोठी लाटच उसळली आहे.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण