शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांपासून झाले नाही वाशिम जिल्हा रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 11:30 IST

Washim district hospital जिल्हा रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट गेल्या ४ वर्षांपासून झालेच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :  फायर ऑडिटप्रमाणेच दर दोन वर्षांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिटदेखील होणे क्रमप्राप्त आहे; मात्र स्थानिक जिल्हा रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट गेल्या ४ वर्षांपासून झालेच नाही. रुग्णालयातील ठिकठिकाणची वायरिंग आणि इलेक्ट्रिकचे बोर्ड सुस्थितीत दिसून आले; मात्र ऑडिटच होत नसल्याने धोकासुद्धा कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात दैनंदिन शेकडो रुग्ण आरोग्य तपासणीसाठी येतात. त्यातील अनेक रुग्ण उपचारार्थ भरतीत राहतात. संबंधितांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच कधीकाळी अनुचित घटना घडल्यास त्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे, याकरिता शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार वेळोवेळी फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र या महत्त्वाच्या बाबींकडे प्रशासकीय दुर्लक्ष होत आहे. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाहणी केली असता, सर्वच ठिकाणची वायरिंग सुस्थितीत असल्याचे दिसून आले; मात्र गेल्या ४ वर्षांपासून ऑन रेकॉर्ड इलेक्ट्रिक ऑडिट झालेले नाही. यामुळे रुग्णसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी याकडे वेळीच लक्ष पुरवून इलेक्ट्रिक ऑडिट करून घ्यावे, अशी मागणी होत आहे.

रुग्णालयातील वायरिंग सुस्थितीत वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाहणी केली असता, सर्वच ठिकाणची वायरिंग रीतसर पाइप टाकून सुस्थितीत असल्याचे दिसून आले. याशिवाय कुठेही इलेक्ट्रिकच्या बोर्डांची तोडफोड झालेली नाही. केवळ अधूनमधून व्होल्टेज कमीअधिक होण्याची समस्या असल्याचे दिसून आले.

‘ऑडिट’बाबत प्रशासनाचे दुर्लक्षशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट दर दोन वर्षांनी व्हायला हवे. रुग्णालय प्रशासनाची ही जबाबदारी होय; मात्र त्याकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून ४ वर्षांपासून ऑडिट झालेले नाही.

जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत उभी झाली, त्यावेळी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या संसाधनांना अनुसरून विद्युत पुरवठा मिळाला होता. सध्या संसाधनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे व्होल्टेजची समस्या जाणवत आहे. रुग्णालयात एक खासगी इलेक्ट्रिशियनची नेमणूक करण्यात आलेली आहे. ऑडिटही लवकरच करून घेतले जाईल.- डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम 

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल