शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी १७ जानेवारीला निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 12:57 IST

१३ जानेवारी रोजी पंचायत समितींच्या सभापती पदांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या निवडणूक कार्यक्रमामुळे राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. त्यानुसार १६ जानेवारी रोजी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी तर १७ जानेवारी रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, १३ जानेवारी रोजी पंचायत समितींच्या सभापती पदांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या निवडणूक कार्यक्रमामुळे राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.वाशिम जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ५२ असून, सत्ता स्थापनेसाठी २७ संख्याबळ आवश्यक आहे. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक त्या संख्याबळाची जुळवाजूळव करण्याकरीता राकाँ, काँग्रेस, शिवसेना, जनविकास आघाडी, भारीप-बमसंतर्फे हालचाली सुरू झाल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच पंचायत समितीचे सभापती व उपसभापती या पदाची निवडणूक केव्हा लागणार याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून होते. १० जानेवारी रोजी हा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्याने राजकीय घडामोडींनी वेग धरला. जिल्ह्यातील सर्व सहा पंचायत समितींच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित करण्याकरिता सोमवार, १३ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत सभेचे आयोजन केले आहे. या सभेला वाशिम जिल्ह्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांना आमंत्रित करण्यात आले आहे. १३ जानेवारी २०२० रोजी पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत झाल्यानंतर गुरुवार, १६ जानेवारी २०२० रोजी सर्व पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक होणार आहे. वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक शुक्रवार, १७ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता वाशिम जिल्हा परिषद येथे होणार असून याकरिता पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, वाशिम यांच्या अध्यक्षतेखालील विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी मतदान घेण्यात येईल.दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहिर होताच राकाँ, काँग्रेस, सेनेची महाविकास आघाडीसाठी गुप्त बैठक झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दुसरीकडे राकाँ व अपक्षाला सोबत घेऊन भारिप-बमसं, जनविकास आघाडीनेही सत्तेत सहभागी होण्याकरीता चाचपणी केल्याची माहिती समोर येत आहे. येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविण्यात येत आहे. या दोन दिवसात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला नाही तर धक्कादायक समिकरण जूळून येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद