शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणूक : मानोऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी; रिसोड, मालेगावात सत्तांतर

By संतोष वानखडे | Updated: October 15, 2022 18:17 IST

Vashim News: वाशिम - जिल्ह्यातील सहा पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती पदासाठी शनिवारी (दि.१५) निवडणूक झाली असून, मानोऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी करीत भाजपाने ‘करेक्ट कार्यक्रम’ केला

संतोष वानखडे - वाशिम - जिल्ह्यातील सहा पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती पदासाठी शनिवारी (दि.१५) निवडणूक झाली असून, मानोऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी करीत भाजपाने ‘करेक्ट कार्यक्रम’ केला तर वाशिम, कारंजा, मंगरूळपिरात महाविकास आघाडीने सत्ता कायम राखली. रिसोड, मालेगावात सत्ता परिवर्तन झाले.

वाशिम पंचायत समिती सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (महिला) राखीव असल्याने आणि त्यातच शिंदेसेनेने एन्ट्री केल्याने निवडणुकीपूर्वी चुरस निर्माण झाली होती. मात्र, ठाकरे गट आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी व अपक्ष सदस्यांना आपल्या तंबूत सहभागी करून घेत शेवटच्या क्षणी निवडणुकीचे चित्र पालटविले. सभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या (ठाकरे गट) सावित्रीबाई गोविंदराव वानखेडे तर उपसभापती पदासाठी काँग्रेसचे गजानन गोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्रतिस्पर्धी गटाकडून सभापती पदासाठी भाजपाच्या रत्नकलाबाइ नप्ते यांनी अर्ज भरला होता. सभापती पदाच्या निवडणुकीवेळी नप्ते व सहकारी सदस्य अनुपस्थित राहिल्याने सभापती म्हणून सावित्रीबाई वानखेडे तर उपसभापती म्हणून गजानन गोटे यांना विजयी घोषित करण्यात आले. विजयी उमेदवारांची समर्थकांनी जल्लोषात मिरवणूक काढली. रिसोड व मालेगावात सत्ता परिवर्तन झाले असून, मानोऱ्यात भाजपाने महाविकास आघाडीत बिघाडी करीत राकाॅंला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळविले.  कारंजा पंचायत समितीच्या निवडणुकीत पूर्वीचेच समिकरण यावेळीही कायम राहिल्याने महाविकास आघाडीची सरशी झाली. डहाके गटाने वर्चस्व कायम राखले असून, सभापतीपदी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदीप यशवंतराव देशमुख तर उपसभापतीपदी वंचीत बहुजन आघाडीच्या अलका अंबरकर यांना विजयी घोषित करण्यात आले.  मंगरूळपीर येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखाताई साहेबराव भगत, तर उपसभापतिपदी उषाताई भाऊराव राठोड यांची अविरोध निवड करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमElectionनिवडणूक