लोकमत न्युज नेटवर्क उंबर्डाबाजार (वाशिम) : जंगलात शेळ्या चारून परत घरी येत असलेल्या ग्राम दुघोरा येथील एक वृध्द महिलेवर जंगली डुकराने हल्ला केल्याची घटना १ जुन रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. यात सदर महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उंबर्डा बाजार येथून जवळच असलेल्या ग्राम दुघोरा येथील सरस्वती गुणाजी भगत (६५) ही वयोवृद्ध महिला दुघोरा ते अडगाव या रस्त्यादरम्यानच्या भागांत शेळ्यांचा कळप चरावयास घेऊन गेली होती. संध्याकाळच्या वेळेस शेळ्या चारून घरी परत येत असताना वृध्द सरस्वतीबाई यांच्यावर जंगली डुकराने अचानक हल्ला केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. सरस्वती बाईच्या उजव्या पायाच्या खालच्या बाजूस तथा डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक तथा ग्रामस्थांनी त्यांना तातडीने उंबर्डाबाजार येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली नवघरे यांनी तातडीने प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. यावेळी आरोग्य वर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर.नांदे यांनी मोफत रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली, तर या कामी राजु घोडे, राजू गाडवे यांनी रूग्णाच्या प्रथमोपचारापासून, तर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यासाठी मोलाची भुमिका बजावली.
जंगली डुकराच्या हल्ल्यात वृध्द महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 12:40 IST
सदर महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जंगली डुकराच्या हल्ल्यात वृध्द महिला जखमी
ठळक मुद्देमहिला दुघोरा ते अडगाव या रस्त्यादरम्यानच्या भागांत शेळ्यांचा कळप चरावयास घेऊन गेली होती. शेळ्या चारून घरी परत येत असताना वृध्द सरस्वतीबाई यांच्यावर जंगली डुकराने अचानक हल्ला केला. उजव्या पायाच्या खालच्या बाजूस तथा डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.