शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेह, उच्च रक्तदाबाचे आठ हजार रुग्ण आढळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:36 IST

आतापर्यंत तीन लाख नागरिकांचे सर्वेक्षण केले असून, त्यापैकी आठ हजार नागरिकांना मधुमेह, हायपरटेन्शन असल्याचे दिसून आले. प्र

वाशिम: कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम राबविण्यात येत असून, जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी आठ हजार नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब असल्याचे समोर आले. दुसरीकडे २३७ संदिग्ध रुग्ण आढळले असून, यापैकी १७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.कोरोनाविरुद्ध लढा देताना आरोग्य सुविधेवर ताण येवू नये यासाठी कोरोना संसर्गाच्या वेगावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न, आरोग्यविषयक जनजागृती आणि लोकसहभागाची गरज या दृष्टिकोनातून ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात जवळपास १२ लाख नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या दरम्यान ८ हजार नागरिक हे मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण असल्याचेही समोर आले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देतानाच या नागरिकांवर आरोग्य विभागाचा वॉचही राहणार आहे. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे आदी लक्षणे आढळून येणारे जवळपास २३७ संदिग्ध नागरिक आढळले असून, यापैकी १७ जणांचा कोरोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला.माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत तीन लाख नागरिकांचे सर्वेक्षण केले असून, त्यापैकी आठ हजार नागरिकांना मधुमेह, हायपरटेन्शन असल्याचे दिसून आले. प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागरिकांनीदेखील या मोहिमेला सहकार्य करून आरोग्य तपासणी करावी.काही शंका असल्यास संबंधित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.-डॉ. अविनाश आहेर,जिल्हा आरोग्य अधिकारी

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या