शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ‘ईद-उल-अजहा’ उत्साहात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 15:04 IST

वाशिम: जिल्ह्यात सोमवार १२ आॅगस्ट रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेली ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सोमवार १२ आॅगस्ट रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेली ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त मुस्लिम बांधवांनी ईदगाहवर नमाज अदा करून अल्लाहकडे विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. मंगरुळपीर, रिसोड, कारंजा, मालेगाव, वाशिम आणि मानोरा तालुक्यात ‘ईद-उल-अजहा’ सणानिमित्त मुस्लिम बांधवांना सर्वधर्मियांकडून शुभेच्छाही देण्यात आल्या. मुस्लिम बांधव ईद-उल-अजहानिमित्त नमाज अदा करण्यासाठी आपापले शहर आणि गावातील ईदगाहवर गोळा झाले. या ठिकाणी शांततेत नमा अदा करण्यात आल्यानंतर ‘खुतबा-ए-ईद’ अदा करून विश्वशांतीसाठी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली. दरम्यान, मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव येथे १२ आॅगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता मुस्लिम हिजरी वर्षातील जिलहज महिन्यातील उर्दू १० तारखेला ईदगाहवर  नमाज-ए ईद-उल-अजाह अदा करून उत्साहात बकरी-ईद साजरी करण्यात आली. नमाज-ए ईद-उल-अजाह अदा करण्यापूर्वी सर्व मुस्लिम बांधाव स्थानिक जामा मशिदीसमोर एकत्र आले. त्यानंतर येथून रॅलीच्या रुपाने हे सर्व बांधव ईदगाह मैदानावर पोहोचले. तेथे इमाम मोहम्मद शाहिद रजा यांनी सर्वांना ईदची नमाज अदा करण्याबाबत मार्गदर्शन केले आणि मौज्जन सलीम खान यांनी अजान दिल्यानंतर ईदची नमाज अदा करण्यात आली. नमाज अदा केल्यानंतर खुतबा-ए-ईद अदा करून सर्वांनी विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, ठाणेदार एस. एस. शिपने यांच्या मार्गदर्शनात ईदनिमित्त चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ईदची नमाज झाल्यानंतर ईदगाहवरून परतलेल्या मुस्लिम बांधवांनी ठाणेदार संजय शिपने आणि पोलीस कर्मचाºयांनी पोलीस-नागरिक मित्रता कायम ठेवताना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :washimवाशिम