शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जपुरवठा करणाऱ्या संरचनेवरील लॉकडाऊनच्या परिणामांचा होणार अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 18:12 IST

शासनाने २८ मे रोजी सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यीय समितीचे गठण केले आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाºया त्रिस्तरीय पतसंरचनेवर कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जारी लॉकडाऊनमुळे होणाºया दूरगामी परिणामांचा अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने २८ मे रोजी सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यीय समितीचे गठण केले आहे. ही समिती अभ्यासपूर्ण निरीक्षण करून आवश्यक उपाय योजनांबाबत शासनाला अहवाल सादर करणार आहे.कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रणासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी केले आहे. सदर लॉकडाऊन मुळे संपूर्ण देशात सामाजिक व आर्थिक जीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच या विषाणूच्या प्रादूभावाचे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी, राज्यातील सहकार क्षेत्रावर देखील हे परिणाम होणार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेत सहकार चळवळीचे योगदान महत्त्वाचे आहे. राज्यात सुमारे दोन लाख सहकारी संस्था कायर्रत असून राज्यातील ५.५ कोटी नागरिक विविध सहकारी संस्थांचे सभासद आहेत. राज्याच्या सहकार क्षेत्रातील खेळते भांडवल सुमारे ३.५ लाख कोटी असून, राज्यातील शेतकºयांना शेती पीक कर्ज पुरवठा करण्यात जिल्हा मध्यर्वती सहकारी बँकांचे योगदान महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील शेतकºयांना कर्जपुरवठा करणाºया त्रिस्तरीय पतसंरचनेवर कोरोना नियंत्रणासाठी जारी केलेल्या लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजनांयाबाबत अभ्यास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, यासाठी राज्यशासनाने सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यीय समितीचे गठण २८ मे रोजी केले. ही समिती शेतकºयांना कर्जपुरवठा करणाºया त्रिस्तरीय पतसंरचनेवर लॉकडाऊनमुळे झालेल्या परिणामांचा सखोल अभ्यास करून आवश्यक उपाय योजनांबाबत आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे. सहकारी बँकांच्या अधिकारी, पदाधिकाºयांचाही सहभागशेतकºयांना कर्जपुरवठा करणाºया त्रिस्तरीय पतसंरचनेवर कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जारी लॉकडाऊनमुळे होणाºया दूरगामी परिणामांचा अभ्यास करण्यासाठी राज्यशासनाने गठीत केलेल्या ९ सदस्यीय समितीत सहकार आयुक्त व निबंधकांच्या व्यतीरिक्त अप्पर आयुक्त व निबंधक पुणे, विभागीय सहनिबंधक कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक, तसेच राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांचे अध्यक्ष, मुख्यकार्यकारी अधिकारी आणि प्रशासकांचाही समावेश केला आहे. 

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्जMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार