लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत ‘एसएसजी१८’ या मोबाईल अॅपव्दारे स्वच्छ भारत मिशनविषयी नागरिकांच्या प्रतिक्रिया नोंदविण्यात येत आहेत. त्याची जनजागृती जिल्ह्यात प्रभावीपणे सुरू असून सोमवार, २७ आॅगस्ट रोजी वाशिम येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाºयांनीही आपापल्या मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड करून उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया नोंदविल्या.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राज्यभरातील ग्रामीण भागात १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत केंद्रशासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक गुण मिळविणाºया जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरून २ आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने वाशिम जिल्ह्यातीलही ४९१ ग्रामपंचायतींमध्ये युद्धस्तरावर जनजागृती केली जात आहे. याअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, मंदिर, यात्रास्थळ आदिंची स्वच्छताविषयक पाहणी केली जाणार आहे. यामध्ये शौचालय सुविधा, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आदी बाबींना प्राधान्य देण्यात यावे, असे शासनाचे निर्देश असून याबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ‘एसएसजी१८’ हे अॅप डाऊनलोड करून त्यावर अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने स्वच्छ भारत मिशनच्या विशेष चमुने २७ आॅगस्ट रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील सर्व कर्मचाºयांना यासंदर्भात मार्गदर्शन केले. कर्मचाºयांनीही उत्स्फूर्तपणे अॅप डाऊनलोड करून आपापल्या प्रतिक्रिया नोंदविल्या.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या ‘अॅप’संबंधी वाशिम जिल्ह्यात प्रभावी जनजागृती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 13:56 IST
वाशिम : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत ‘एसएसजी१८’ या मोबाईल अॅपव्दारे स्वच्छ भारत मिशनविषयी नागरिकांच्या प्रतिक्रिया नोंदविण्यात येत आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या ‘अॅप’संबंधी वाशिम जिल्ह्यात प्रभावी जनजागृती!
ठळक मुद्दे शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, मंदिर, यात्रास्थळ आदिंची स्वच्छताविषयक पाहणी केली जाणार आहे.प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ‘एसएसजी१८’ हे अॅप डाऊनलोड करून त्यावर अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.