लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पदभरतीबाबतच्या जाहिरातीचा खुलासा देण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाचे लिपीक गोविंद टाले यांनी पाळोदी येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाच्या वरीष्ठ लिपीकाकडून खासगी इसमाद्वारे पाच हजार रूपये लाच स्विकारल्याची घटना २४ नोव्हेंबरला घडली. याप्रकरणी एसीबीच्या पथकाने खासगी ईसम व संबंधित लिपीक अशा दोघांनाही २४ नोव्हेंबरला ताब्यात घेतले. मानोरा तालुक्यातील पाळोदी येथील सेवादास शिक्षण संस्थेअंतर्गत कार्यान्वित वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयातील पदभरतीबाबत माजी सदस्याने जाहीरात कशी काय दिली, याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना भेटून माजी सदस्याने बोगस जाहिरात दिल्याबाबत सांगितले. दरम्यान, जाहिरातीस शिक्षण विभागाकडून मान्यता मिळाली काय, याबाबत लेखी अर्ज देऊन शिक्षणाधिकाºयांना खुलासा मागितला. यासंदर्भात शिक्षणाधिकाºयांनी लिपीक टाले यांची भेट घेण्यास सांगितले. मात्र, टाले यांनी लेखी खुलासा देण्यासाठी पाच हजारांची लाच मागितली, अशा तक्रारीहून एसीबीच्या पथकाने २३ नोव्हेंबरला पंचासमक्ष पडताळणी केली. यावेळी टाले यांनी पाच हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे आढळून आले. सदर पाच हजार रूपये खासगी ईसम शेख इरफान शेख मेहमुद (रा. बागवान पुरा, वशिम) यांच्याकडे २४ नोव्हेंबरला देण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे खासगी ईसम शेख मेहमुद याने तक्रारदाराकडून पाच हजाराची लाच स्विकारली. त्यावरून लिपीक टाले व शेख इरफान शेख मेहमुद या दोघांनाही पोलीस निरिक्षक एन.बी. बोºहाडे यांच्या पथकाने ताब्यात घेतले. याबाबत वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
माध्यमिक शिक्षण विभागाचा लिपीक ‘एसीबी’च्या जाळ्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 20:18 IST
माध्यमिक शिक्षण विभागाचे लिपीक गोविंद टाले यांनी पाळोदी येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाच्या वरीष्ठ लिपीकाकडून खासगी इसमाद्वारे पाच हजार रूपये लाच स्विकारल्याची घटना २४ नोव्हेंबरला घडली. याप्रकरणी एसीबीच्या पथकाने खासगी ईसम व संबंधित लिपीक अशा दोघांनाही २४ नोव्हेंबरला ताब्यात घेतले.
माध्यमिक शिक्षण विभागाचा लिपीक ‘एसीबी’च्या जाळ्यात!
ठळक मुद्देखासगी इसमाद्वारे स्विकारली लाच दोन आरोपी जेरबंद