शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

वाशिम जिल्ह्यातील तीन बाजार समित्यामध्ये होणार ई-नाम प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 14:39 IST

रिसोड, कारंजा आणि मानोरा या तीन या बाजार समितीत ही प्रणाली राबविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :नव्या वर्षांत शेतमाल खरेदी प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी अधिक सुलभ होणार आहे. शासनाच्या धोरणानुसार जिल्ह्यातील रिसोड, कारंजा आणि मानोरा बाजार समितीत ई-नाम (इलेक्ट्रीकल नॅॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट) प्रणालीची अमलबजावणी नव्या वर्षात होणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्ह्यात या प्रणालीतील बाजार समित्यांची संख्या पाच होणार असून, जिल्ह्यात यापूर्वी मंगरुळपीर आणि वाशिम बाजार समितीत ही प्रणाली राबविण्यात येत आहे.बाजार समित्यांमधील शेतमालाची खरेदी-विक्री व्यवस्था इलेक्ट्रॉनिक प्लॅट फॉर्मवर आणण्यासाठी राज्यातील ६३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा ‘ई-नाम’ योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी शासनाने नोडल अधिकारी म्हणून विभागीय स्तरावर विभागीय सहनिबंधक, तर जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधकांकडे जबाबदारी सोपविली आहे. या ई-नाम योजनेची राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांना राज्यस्तरीय नोडल एजन्सी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यापुढे ई-नाम योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय नोडल एजन्सी म्हणून कार्यरत राहणार असून, ई-नाम योजनेची विभाभीय स्तरावर अमलबजावणी करण्याकरीता सर्व संबंधीत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था व जिल्हा स्तरावर अंमलबजावणी करण्याकरीता सर्व संबंधीत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांना ई-नाम योजनेचे समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात यापूर्वी मंगरुळपीर आणि वाशिम बाजार समितीत या प्रणालीचा अवलंब करण्यात आलेला असून, आता रिसोड, कारंजा आणि मानोरा या तीन या बाजार समितीत ही प्रणाली राबविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. यासाठी पणन मंडळाकडे प्रस्तावही पाठविण्यात आले आहेत.शेतकऱ्यांना मिळणार ‘आॅनलाईन मार्केटिंग प्लॅटफॉर्म’शेतमाल विक्री व्यवस्थेमधील पारंपरिक पद्धती बंद करून संगणकीकृत आणि आॅनलाईन लिलावाद्वारे व्यवहार करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी बाजाराची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या प्रणालीद्वारे देशातील बाजार समित्या व त्यांचे व्यवहार इंटरनेटद्वारे राष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्यात आले आहेत. परिणामी शेतकºयांना ‘आॅनलाईन मार्केटिंग कंपन्यांचे ‘प्लॅटफॉर्म’ मिळणार आहे. या प्रणालीलंतर्गत ‘ई-आॅक्शन’ ई-वे-स्केलचा समावेश असल्याने शेतकºयांना मोठा फायदाही होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिमRisodरिसोडKaranjaकारंजाManoraमानोरा