शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

इ-क्लास जमिन घेईल मोकळा श्वास; अतिक्रमण हटविण्यासाठी पथक गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 16:37 IST

वाशिम : वाशिम शहराला लागूनच असलेल्या शेलूबाजार मार्गावरील कोट्यवधी रुपये किंमतीची इ-क्लास जमिन लवकरच अतिक्रमणातून मुक्त होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. अतिक्रमण काढण्यासाठी संबंधितांना तीन दिवसांची मुदत दिली आहे.कोट्यवधी रुपये किंमतीची इ-क्लास जमिन अतिक्रमणमुक्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम शहराला लागूनच असलेल्या शेलूबाजार मार्गावरील कोट्यवधी रुपये किंमतीची इ-क्लास जमिन लवकरच अतिक्रमणातून मुक्त होण्याची चिन्हे दिसत आहेत. सर्वे नंबर ४४६, ४४७ मधील अतिक्रमण हटविण्यासाठी उपविभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून, अतिक्रमण काढण्यासाठी संबंधितांना तीन दिवसांची मुदत दिली आहे.वाशिम शहरात तसेच शहर परिसरात महसूल विभागाच्या मालकीच्या अनेक जमिनी, भूखंड आहेत. काही प्रकरणं न्यायप्रविष्ठ आहेत तर काही भूखंड, जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. शहराला लागून असलेल्या रेल्वे लाईन, शेलुबाजार मार्गालगतच्या सर्वे नंबर  ४४६, ४४७ या ठिकाणी अनेकांनी अतिक्रमण केल्याची बाब महसूल विभागाच्या पाहणीतून समोर आली आहे. काही जणांनी तर पक्के बांधकाम करून तेथे ठाण मांडले आहे.   सर्वे नंबर ४४६ आणि ४४७ मधील इ-क्लास जमिनीवरील अतिक्रमणासंदर्भात वाशिम तहसिल कार्यालयाने जिल्हाधिकाºयांकडे पत्रव्यवहारही केला होता. याची दखल घेत जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी  ‘अतिक्रमण निष्कासित पथक’ गठीत करण्याचे निर्देश २८ मे रोजी दिले आहेत. या पथकाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी तर उपाध्यक्ष म्हणून वाशिम तहसिलदार आणि सदस्य सचिव म्हणून वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी व भूमि अभिलेख विभागाचे उपअधीक्षक यांचा समावेश आहे. या पथकाने अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी मोडक यांनी दिल्या आहेत. अतिक्रमणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने योग्य तो पोलीस बंदोबस्त पुरवावा, अशा सूचनाही पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांना दिल्या आहेत. पथक गठीत झाल्याने कोट्यवधी रुपये किंमतीची इ-क्लास जमिन अतिक्रमणमुक्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.तीन दिवसांची मुदतसर्वे नंबर ४४६, ४४७ मधील इ-क्लास जमिनीवर अनेकांनी पक्के बांधकाम केले आहे. काही जण येथे वास्तव्य करतात तर काही जणांनी भूखंड ताब्यात ठेवले आहेत. या जमिनी व भूखंडावरील अतिक्रमण करणाºया संबंधित नागरिकांना महसूल विभागाने नोटीस बजावून तीन दिवसात स्वत:हून अतिक्रमण हटवावे, असे निर्देश दिले आहेत. तीन दिवसात अतिक्रमण हटविले नाही तर महसूल, नगर परिषद व पोलीस प्रशासनातर्फे अतिक्रमण काढण्यात येईल, अतिक्रमण काढण्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल किंवा संबंधित नागरिकांच्या घरातील साहित्य जप्त केले जाईल, असा इशाराही देण्यात आला.निवासी, वाणिज्यिक प्रयोजनवाशिम शहरालगतच्या सर्वे नंबर ४४६, ४४७ मधील इ-क्लास जमिन ही निवासी तसेच वाणिज्यिक प्रयोजनासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. ‘म्हाडा’च्या गृहनिर्माण प्र्रकल्पासाठी सदर जमिन उपयुक्त ठरू शकते तसेच वाणिज्यिक वापरासाठीदेखील भविष्यात ही जमिन महत्त्वाची ठरणार असल्याने या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मोहिम हाती घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :washimवाशिमEnchroachmentअतिक्रमण